हिंदु राष्ट्र कोण आणेल ?

‘स्वार्थासाठी मागण्या करणारे नव्हे, तर त्याग करणारेच हिंदु राष्ट्र आणतील !’

हिंदु राष्ट्रात गुन्हेगार नसतील !

‘समाज सात्विक होण्यासाठी धर्मशिक्षण न देता केवळ गुन्हेगारांना शिक्षा करून गुन्हे टाळता येत नाहीत, हेही न कळणारे आतापर्यंतचे शासनकर्ते ! हिंदु राष्ट्रात सर्वांना धर्मशिक्षण दिल्याने गुन्हेगारच नसतील !’ – (परात्पर   गुरु) डॉ. आठवले  

मनुष्याचे स्वातंत्र्य !

मनुष्याला स्वातंत्र्य असते, तर इच्छेप्रमाणे सारे होऊ शकले असते; पण तसे होत नाही. म्हणूनच त्याला ‘अस्वातंत्र्य’ म्हणावे लागते.

‘आंधळे’ बुद्धीप्रामाण्यवादी !

‘एखाद्या आंधळ्याने दृश्याचे वर्णन करावे, याप्रमाणे धर्माचे शून्य ज्ञान असलेल्या बुद्धीप्रामाण्यवाद्यांचे धर्मासंदर्भातील बोलणे असते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

आश्‍चर्य !

‘पैसा मिळवण्यापेक्षा त्याचा त्याग करणे अधिक सुलभ आहे, तरी मानव तो करत नाही, हे आश्‍चर्य आहे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

भक्ती ही सर्व मार्गांपेक्षा श्रेष्ठतम असणे

स्वानुभवानेच अनुभवता येणार्‍या भक्तीविषयी शब्दांच्या अवडंबराने कंठशोष करण्यापेक्षा तिचा अनुभव घेऊन पहा, ती समजून घ्या, तिच्यापासून चांगली फळे प्राप्त करून घ्या.

 धर्मबंधनाचे महत्त्व !

‘व्यक्तीस्वातंत्र्याने मानव भरकटत जातो; कारण तो सात्त्विक नाही. असे होऊ नये; म्हणून त्याला धर्मबंधन हवे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

स्वतःच्या आत्मरूपाचा शोध घेऊन आनंदघन होणे महत्त्वाचे !

या सुकणार्‍या, नश्‍वर देहाचा अभिमान किती दिवस ठेवायचा? यामध्ये काय आहे ? आनंदघनाचे स्वरूप विसरण्यास याचा अभिमान कारण बनून अपरिमित दुःखास कारणीभूत होत असेल, तर याचा अभिमान सोडण्यास कोणता मुहूर्त पहावयास हवा ?

ईश्‍वरी राज्याचे कल्पनातीत महत्त्व !

‘अनेक गुन्हे करून आत्महत्या करणार्‍याला सरकार कशी शिक्षा करणार ? ईश्‍वर मात्र करतो. यावरून ईश्‍वराचे राज्य किती कल्पनातीत आहे, हे लक्षात येते. त्यामुळे ईश्‍वरी राज्याच्या स्थापनेसाठी प्रयत्नरत रहा !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले  

दुष्टांना क्षमा करणे, हा क्षमेचा अतिरेक आणि दुरुपयोगच !

‘दुष्टांना क्षमा करणे, हा क्षमेचा अतिरेक आणि दुरुपयोगच होय.’ भारतातील सोमनाथ आदि मंदिराचे भग्न अवशेष हे सौजन्य, शांती आणि क्षमा यांच्या अतिरेकाचे दुष्परिणाम व्यक्त करतात. अतिरेकाचे आणि दुष्टांविषयी शांती दाखवल्याने त्यांचा स्वभाव, तर पालटणार नाहीच; पण त्यामुळे आत्मनाश होण्याची शक्यताच अधिक !