वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात गीता प्रेसच्या अभिनंदनाचा, तर काँग्रेसच्या निषेधाचा प्रस्ताव एकमताने संमत !

काँग्रेसकडून भारतात हिंदूविरोधी वक्तव्य केले जाते, तर भारताबाहेर देशविरोधी वक्तव्य केले जाते. अशा काँग्रेसचा वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव निषेध करते.

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवामध्ये ‘हलाल सर्टिफिकेशन : वैश्विक अर्थव्यवस्थेवर आक्रमण’ या ई-पुस्तकाचे प्रकाशन !

वैश्विक अर्थव्यवस्थेवर आक्रमण’ या ई-पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. हे पुस्तक मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांमध्ये ‘ॲमेझॉन किंडल’वर विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.

नाशिक येथील श्री विघ्नेश्वर मंदिराचे विश्वस्त रवींद्र पाटील यांच्याकडून हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांविषयी गौरवोद्गार !

श्री. रवींद्र पाटील म्हणाले, ‘‘येथे हिंदुत्वाच्या अधिवेशनाऐवजी संत आणि महापुरुष यांच्यामध्ये असल्याप्रमाणे मला वाटत आहे. येथे सेवा करणार्‍या सर्वांच्या मुखावर किती तेज आहे ! सर्वांच्या वागण्यात किती नम्रता आहे.

निधर्मी सरकारकडून केरळमधील हिंदु धर्म आणि संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न ! – राकेश नेल्लिथया, केरळ

केरळमधील स्थिती अतिशय भयावह आहे. तेथे मुसलमान पंथियांची लोकसंख्या ३० टक्के झाली आहे. त्यामुळे काश्मीरसारखी परिस्थिती बनत चालली आहे.

हरियाणातील धर्मांधांच्या वाढत्या हिंदुविरोधी कारवायांना तोंड देणे श्रीकृष्णाच्या कृपेने शक्य ! – कृष्ण गुर्जर, प्रांत सुरक्षा प्रमुख, बजरंग दल, हरियाणा

बजरंग दलाने धर्मांधांनी बांधलेल्या अवैध मशिदी आणि मजार यांचे अतिक्रमण हटवण्याचा प्रयत्न केला. यासमवेतच दलाने लव्ह जिहाद, लॅण्ड जिहाद, गोरक्षण, दलित अन्याय निवारण आदींसाठी कार्य केले.

ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांच्या उपासनेने हिंदु राष्ट्राची स्थापना करणे शक्य ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक संत, सनातन संस्था

आध्यात्मिक साधना केल्याने आत्मविश्वास जागृत होतो आणि व्यक्ती तणावमुक्त जीवन जगू शकते. साधना करून आपण आपल्या कृतीच्या फळाची अपेक्षा न ठेवता कार्य करू शकतो आणि प्रत्येक कृतीतून आनंद मिळवतो.

नक्षलवादी आणि ख्रिस्ती धर्मप्रचारक यांची देशविरोधी युती ! – अधिवक्ता (सौ.) रचना नायडू, छत्तीसगड

नक्षलवाद्यांकडून वनवासी मुलांच्या हातांमध्ये बलपूर्वक बंदुका दिल्या जात आहेत. नक्षलवादी संघटनांमध्ये सहभागी होण्यास नकार देणार्‍यांची क्रूरपणे हत्या करण्यात येते.

तमिळनाडूमधील हिंदुविरोधी कारवायांना सरकारी पाठिंबा ! – श्री. अर्जुन संपत, संस्थापक अध्यक्ष, हिंदू मक्कल कत्छी, तमिळनाडू

तमिळनाडूमध्ये मोठ्या प्रमाणात हिंदुविरोधी कारवाया चालू असल्या, तरी तमिळनाडू ही मूळ हिंदूंची पुण्यभूमी आहे. नवीन संसदेमध्ये नेण्यात आलेला ‘सांगोल’ (धर्मदंड) या भूमीतूनच नेण्यात आला.

अखंड भारतासाठी गोहत्या थांबवणे आवश्यक ! – सतीश कुमार, राष्ट्रीय अध्यक्ष, गोरक्षा दल

जेव्हापासून देशात गोहत्या चालू झाली, तेव्हापासून अखंड भारताचे तुकडे झाले. गोमाता ही भूमातेचे रूप आहे. ज्या भूमीवर तिचे तुकडे होतील, त्या भूमीचेही तुकडे होतील.

शीख, जैन, बौद्ध यांनी ‘हिंदु’ आहोत, हे समजून घ्यायला हवे ! – कर्नल करतार सिंह मजीठिया, कृपाल रूहानी फाऊंडेशन, गोवा

धर्माच्या रक्षणासाठी हिंदूंना कुणावरही अवलंबून रहाता येणार नाही. हिंदु धर्म आणि मंदिरे यांवर आक्रमण करणार्‍यांना हिंदूंनी सोडू नये. हिंदूंनी कुणावर आक्रमण करू नये; मात्र स्वत:च्या रक्षणासाठी हिंदूंना सिद्ध रहायला हवे.