अलंकापुरीत जमला वैष्णवांचा मेळा; माऊलींच्या पालखी सोहळ्याचे आज होणार पंढरपूरकडे प्रस्थान !

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे ११ जून या दिवशी सायंकाळी ४ ते ६ च्या दरम्यान आळंदीतील देऊळवाड्यातून पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. पालखी प्रस्थान सोहळा ‘याची देही याची डोळा’ अनुभवण्यासाठी राज्याच्या कानाकोपर्‍यांतून छोट्या-मोठ्या दिंड्या अलंकापुरीत आल्या आहेत.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या १२१ शाळा शिक्षकांविना !

महाराष्ट्रात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढत असतांना शिक्षकांची पदे रिक्त ठेवून विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी करणारे प्रशासन काय कामाचे ?

गोवा : उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हणजुणे पंचायतीकडून १७५ अनधिकृत बांधकामांना नोटीस

न्यायालयाने आदेश दिल्यानंतर नोटीस पाठवणारी हणजुणे पंचायत किनारा नियंत्रण क्षेत्रात १७५ बांधकामे होत असतांना काय करत होती ? अनधिकृत बांधकामे करणार्‍यांशी पंचायतीचे साटेलोटे आहे का ? कि पंचायत निष्क्रीय आहे ?

गोव्यात पुढील ४८ घंट्यांत मोसमी पावसाच्या आगमनासाठी हवामान अनुकूल

गोवा आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाने जनतेला न घाबरण्याचे, होड्यांमधून किनारी भागात न जाण्याचे अन् सर्व सागरी क्रीडा बंद करण्याचे, तसेच ०८३२२४१९५५०, ०८३२२२२५३८३, ०८३२२७९४१०० या आपत्कालीन क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

येरवडा (पुणे) कारागृहात बंदीवानांसाठी अधिकृत ‘फोन बूथ’ सुविधा

कारागृह प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

आता बनावट बियाणे विकणार्‍यांना १० वर्षांची शिक्षा ! – अब्दुल सत्तार, कृषीमंत्री

यापुढे बनावट बियाणे विकणार्‍यांना १० वर्षांची शिक्षा होणार असून यासाठी येत्या पावसाळी अधिवेशनात कायदा आणला जाणार आहे, अशी घोषणा त्यांनी केली आहे. येथील दैनिक ‘लोकमत’च्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त होत असलेल्या कार्यक्रमाच्या ठिकाणी ते बोलत होते.

नाशिक येथे कंटेनरच्या धडकेत २ जैन साध्वींचा मृत्यू !

कंटेनरने प्रथम पिकअप, ओमनी गाडी आणि नंतर पायी चालणार्‍या साध्वींना धडक दिली. नाशिकला चातुर्मास करण्यासाठी त्या दोघी पायी जात होत्या.

पिंपरी महापालिकेचे साहाय्यक उद्यान निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कह्यात !

अशा लाचखोर अधिकार्‍यांवर बडतर्फीची कारवाई करायला हवी. ‘त्यांच्यावर कुणाचा वचक नसल्याने लाच घेण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत’, असेच कुणालाही वाटेल !

वारकर्‍यांच्या सेवेसाठी पिंपरी पालिकेकडून १२ पथके !

जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सहभागी वारकर्‍यांना विविध सेवासुविधा पुरवण्यासाठी महापालिका आयुक्तांनी १२० अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती केली आहे.

दौंड शहरातून २ सहस्र ४२८ किलो गोमांस जप्त; ३ धर्मांधांसह एकाला अटक !

गोहत्या बंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही न होण्याचा परिणाम ! आतातरी गोहत्या करणार्‍यांना कठोर शिक्षा होणार का ?