‘द केरल स्टोरी’ चित्रपट ‘इस्लामिक स्टेट’वर आहे, याला विरोध करणारे आतंकवादी आहेत ! – अभिनेत्री कंगना राणावत

‘द केरल स्टोरी’ हा चित्रपट इस्लामिक स्टेटविना कुणालाही वाईट किंवा चुकीचे म्हणत नाही, असे देशातील सर्वांत उत्तरदायी संस्था असणारे उच्च न्यायालय असे म्हणत असेल, तर त्याचे म्हणणे बरोबर आहे. इस्लामिक स्टेट ही आतंकवादी संघटना आहे.

समलैंगिकता एक विकृती असून या विवाहाला मान्यता दिल्यास समाजात हा प्रकार वाढीस लागेल ! – राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, महिला शाखा

समलिंगी विवाह म्हणजे एक विकार ! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महिला शाखेशी संलग्न असलेल्या ‘संवर्धिनी न्यास’ने समलिंगी विवाहाविषयी केलेले सर्वेक्षण !

‘द रॅशनलिस्‍ट मर्डर्स’ पुस्‍तकाचा पुणे येथे प्रकाशन सोहळा !

नास्‍तिकतावाद्यांच्‍या हत्‍यांनंतर हिंदुत्‍वनिष्‍ठांचे अटकसत्र, भरकटून टाकण्‍यात आलेले अन्‍वेषण यांविषयी आतापर्यंत उजेडात न आलेल्‍या तथ्‍यांवर सुप्रसिद्ध डॉ. अमित थडानी यांनी वस्‍तूनिष्‍ठ, निष्‍पक्षपाती आणि सडेतोड लिखाण ‘द रॅशनलिस्‍ट मर्डर्स’ या पुस्‍तका केले आहे. 

शरद पवार यांनी राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या अध्‍यक्षपदाची धुरा पुन्‍हा स्‍वत:कडे घेतली !

राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या राष्‍ट्रीय अध्‍यक्षपदावरून निवृत्त होत असल्‍याची घोषणा करणार्‍या शरद पवार यांनी त्‍यांचा निर्णय मागे घेत पुन्‍हा या पदाची धुरा स्‍वत:कडे घेतली आहे.

श्री तुळजाभवानीदेवीच्या मंदिरातील दानपेटीचा लिलाव बंद केल्यापासून मंदिराच्या उत्पन्नात मोठी वाढ !

श्री तुळजाभवानीदेवीच्या मंदिरातील दानपेट्यांच्या लिलावाची पद्धत बंद झाल्यापासून मागील १३ वर्षांत मंदिरातील रोख रक्कम आणि सोने-चांदी यांच्या स्वरूपातील उत्पन्न १० पटींनी वाढले आहे.

‘द केरल स्टोरी’ चित्रपट आतंकवाद्यांच्या षड्यंत्राची कथा ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, या देशाचा दुर्दैव आहे की, समाजाला उद्ध्वस्त करणार्‍या आतंकवादी प्रवृत्तींच्या पाठीशी काँग्रेस उभी राहिलेली दिसत आहे. हे लोक ‘द केरल स्टोरी’ चित्रपटावर बंदी घालण्याचा प्रयत्न करत आहेत.

शरद पवार यांचे त्यागपत्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य समितीने एकमताने फेटाळले !

शरद पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाचे दिलेले त्यागपत्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य समितीने फेटाळले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात ५ मे या दिवशी या समितीच्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला.

पाकला माहिती पुरवल्याच्या प्रकरणी पुण्यातील डी.आर्.डी.ओ.च्या संचालकांना ए.टी.एस्.कडून अटक !

मातृभूमीशी प्रतारणा करणार्‍या अशा अधिकार्‍यांना कठोर शिक्षा होणे अपेक्षित आहे. डी.आर्.डी.ओ.सारख्या संरक्षणाशी संबंधित महत्त्वपूर्ण संस्थेमध्ये असे प्रकार घडत असतील, तर हे गंभीर आहे !

‘द केरल स्टोरी’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केरळ उच्च न्यायालयाने फेटाळली !

मद्रास उच्च न्यायालयानेही याचिका फेटाळून लावली !