समाजकंटकांकडून बेळगाव येथील जिल्हा रुग्णालयावर दगडफेक, रुग्णवाहिका जाळली

जिल्हा रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूमुळे संतप्त समाजकंटकांनी २२ जुलैच्या रात्री रुग्णालयासमोर थांबलेली रुग्णवाहिंका जाळली. जमावाने येथील पोलीस हवालदारास मारहाण करून पोलीस वाहन, बंदीवानांचे वाहन आणि रुग्णालय यांवर दगडफेक केली.

स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेकडून रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाला १० ‘इलेक्ट्रिक केटल्स’ सुपुर्द

जिल्ह्यात वाढती कोरोनाबाधित रुग्ण संख्या लक्षात घेऊन येथील जिल्हा रुग्णालयांमध्ये आवश्यक असलेली १० विद्युत् किटली (इलेक्ट्रिक केटल्स) जिल्हा रुग्णालयाचे प्रभारी डॉ. संघमित्रा फुले यांच्याकडे सुपुर्द करण्यात आली.

पुण्यातील गणेशोत्सव मंडळांच्या वतीने आरोग्योत्सवास प्रारंभ

शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर मध्य पुण्यातील २७२ गणेशोत्सव मंडळांनी पुढाकार घेतला आहे. जय गणेश व्यासपिठाच्या माध्यमातून त्यांनी आरोग्य सेवेला आरंभ केला आहे.

मिरज तालुक्यातील शिवकालीन वटवृक्ष वाचवण्यात यश

मिरज तालुक्यातील भोसे येथील प्रसिद्ध यल्लम्मा मंदिराजवळ ४०० वर्षांपूर्वीचा म्हणजे शिवकालीन वटवृक्ष आहे. हा वटवृक्ष तोडण्यात येणार होता. आराखड्यात पालट करून वृक्षाचे रक्षण होऊ शकते, असे निदर्शनास आले. त्याची कार्यवाही करण्याचा निर्णय घेण्यात आला.

सांगली महापालिका क्षेत्रात दळणवळण बंदीच्या पहाणीसाठी २३ पथके सिद्ध

सांगली महापालिका क्षेत्रात कडक दळणवळण बंदी चालू झाली आहे. ३० जुलैपर्यंत शहरातील बाजारपेठा, दुकाने, उपाहारगृहे, मॉल्स बंद रहाणार आहेत. कडक कार्यवाहीसाठी महापालिकेची २३ पथके सिद्ध केल्याची माहिती आयुक्त नितीन कापडनीस यांनी दिली आहे.

चिपळूण येथे मास्क न वापरणार्‍या २३६ जणांवर कारवाई : १ लाख १८ सहस्र रुपयांचा दंड वसूल

प्रशासनाने मास्क न वापरणार्‍या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. येथील बाजारपेठेत विनामास्क फिरणारे आणि दुकानांमध्ये मास्क न वापरणारे अशा २३६ जणांवर नगरपरिषदेच्या भरारी पथकाने दंडात्मक कारवाई केली.

बकरी ईद आणि शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याने गुन्हा नोंद 

बकरी ईद आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विषयी आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याने शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे

राज्यातील १२ आमदारांच्या विरोधातील अपात्रता याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी

काँग्रेस आणि मगोप यांनी राज्यातील एकूण १२ आमदारांच्या विरोधात प्रविष्ट केलेल्या अपात्रका याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात २४ जुलै या दिवशी सुनावणी होणार आहे.

गुजरात उच्च न्यायालयाच्या कामकाजाची तुलना जुगाराच्या अड्डयाशी करणार्‍या अधिवक्त्यावर कारवाई

गुजरात उच्च न्यायालयाने येथील अधिवक्त्यांच्या संघटनेचे अध्यक्ष अधिवक्ता यतिन ओझा यांच्यावर न्यायालयाचा अवमान केल्याच्या प्रकरणी कारवाई करत त्यांची ज्येष्ठता रहित केली.

आमदार वैभव नाईक यांच्या संपर्कात आलेले प्रशासकीय अधिकारी आणि मालवणमधील त्यांचे कार्यकर्ते यांचे कोरोना चाचणी अहवाल नकारात्मक

शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेले प्रशासकीय अधिकारी आणि आमदार नाईक यांचे कार्यकर्ते यांच्या कोरोनाशी संबंधित चाचण्या करण्यात आल्या.