चिपळूण येथे मास्क न वापरणार्‍या २३६ जणांवर कारवाई : १ लाख १८ सहस्र रुपयांचा दंड वसूल

चिपळूण – जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या आदेशानुसार येथील नगरपरिषद प्रशासनाने मास्क न वापरणार्‍या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. येथील बाजारपेठेत विनामास्क फिरणारे आणि दुकानांमध्ये मास्क न वापरणारे अशा २३६ जणांवर नगरपरिषदेच्या भरारी पथकाने दंडात्मक कारवाई केली. या कारवाईतून १ लाख १८ सहस्र रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

ही दंडाची रक्कम भरण्यावरून नगरपरिषदेच्या अधिकार्‍यांशी हुज्जत घालणार्‍या येथील ५ व्यापार्‍यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे.