रुग्णालयांनी जादा देयकांची आकारणी करू नये ! – पुणे जिल्हाधिकारी

रुग्णालयांना अशा प्रकारच्या सूचना द्याव्या लागणे, ही लाजिरवाणी गोष्ट नाही का ? हे रोखण्यासाठी धर्मशिक्षण आणि नैतिक मूल्य शिकवण्याला पर्याय नाही.

डॉ. राजेश देशमुख

पुणे – कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणार्‍या रुग्णालयांकडून अधिक प्रमाणात देयकांची आकारणी होत असल्याच्या तक्रारी येत असल्याने जिल्हा प्रशासनाने देयकांची तपासणी करण्यासाठी पथके नेमण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रुग्णालयांनी जादा देयकांची आकारणी करू नये, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या आहेत. जिल्हा प्रशासन सध्या ऑक्सिजन आणि रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत करण्याच्या कामात गुंतले आहे; मात्र रुग्णालयांकडून देयके अधिक प्रमाणात दिल्याच्या तक्रारी येत असल्याने तपासणीसाठी पथके नेमण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.