रुग्णालयाचे देयक न भरल्याने कोरोनाबाधित रुग्णाचा मृतदेह ३ दिवस शवागारात !

लोणावळा – रुग्णालयाचे देयक भरले नाही म्हणून कोरोनाबाधित रुग्णाचा मृतदेह ३ दिवस शवागारामध्ये ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना तळेगाव दाभाडे येथील मायमर संचालित डॉ. भाऊसाहेब सरदेसाई ग्रामीण रुग्णालयात घडली. मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी मध्यस्थी केल्यानंतर मृतदेह नातेवाइकांना दिला. बारणे यांनी या प्रकाराची माहिती मुख्यमंत्र्यांचे ओ.एस्.डी, विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना दिली. (यात तथ्य असेल तर संबंधितांवर काय कारवाई झाली, हेसुद्धा जाहीर केले पाहिजे ! – संपादक)

रुग्णालयाने देयकासाठी मृतदेह अडवून ठेवला हे म्हणणे चुकीचे आहे. कारण रुग्णालयाने अधिकाधिक रुग्णांना महात्मा फुले योजनेची, तसेच योजनेविना असणार्‍या गरजू रुग्णांना अतिरिक्त सवलत दिली असल्याचे एम्.आय.एम्.ई.आर्. वैद्यकीय महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. धनाजी जाधव यांनी सांगितले.