सनातनची साधिका कु. प्रणिता दिवटे लेखापरीक्षक (ग्रुप १) परीक्षेत उत्तीर्ण

या यशाविषयी कु. प्रणिता म्हणाली, ‘‘अभ्यास करतांना नामजप, तसेच अत्तर-कापूर यांचे उपाय नियमित केले. याच समवेत नियमित प्रार्थनाही करते. केवळ ईश्‍वरी कृपा आणि गुरुदेवांचा आशीर्वाद यांमुळे हे शक्य झाले.’’

पूजाला न्याय मिळेपर्यंत मी लढणार ! – तृप्ती देसाई

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या माध्यमातून चौकशी करण्याची मागणी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी केली आहे.

माघ यात्रेच्या पार्श्‍वभूमीवर पंढरपूर शहर आणि परिसरातील गावांमध्ये २४ घंट्यांसाठी संचारबंदी

कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे २३ फेब्रुवारी या दिवशी होणार्‍या माघ वारीच्या पार्श्‍वभूमीवर २२ फेब्रुवारीच्या रात्री १२ पासून ते २३ फेब्रुवारीच्या रात्री १२ वाजेपर्यंत २४ घंट्यांसाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कोरोनामुळे यात्राकाळात भाविकांना शहर प्रवेश बंदी असणार आहे

अमरावती शहरातून अपहरण झालेल्या ४ वर्षांच्या मुलाची नगर पोलिसांनी केली सुटका

अमरावती शहरातून अपहरण करून नगर शहरात आणलेल्या नयन मुकेश लुणीया या ४ वर्षीय मुलाची येथील जिल्हा गुन्हे अन्वेषण शाखेने सुखरूप सुटका केली. या प्रकरणी एका धर्मांध महिलेसह ५ धर्मांधांना पोलिसांनी अटक केली आहे.

गोरक्षक अंकुश गोडसे यांच्या स्वदेशी गोमूत्र अर्क यंत्रनिर्मितीच्या पहिल्या टप्प्यातील बॉयलयरचे पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या हस्ते पूजन आणि उद्घाटन !

‘हे यंत्र गोशाळांना आर्थिकदृष्ट्या परवडणारे, वापरण्यास सोपे, दीर्घायुषी आणि स्टेनलेस स्टील या धातूपासून बनवण्यात आले आहे. गेल्या ५ वर्षात भारतभर जवळपास ५०० गोशाळांत अशा यंत्रांची स्थापना करण्यात आली आहे. येणार्‍या वर्षात ३०० गोशाळांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

समाजात विषवल्ली पसरवणारे, तसेच देशद्रोहाचा गुन्हा नोंद असलेल्या कन्हैयाकुमार याचे जाहीर व्याख्यान रहित करा !

देहली येथील ‘जे.एन्.यू.’ विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैयाकुमार याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंद असून त्याला न्यायालयाने अंतरिम जामीन दिला आहे. हाच कन्हैयाकुमार २० फेब्रुवारी २०२१ या दिवशी कोल्हापूर येथे जाहीर व्याख्यान देण्यासाठी येत आहे.

माझ्या यशात भारतीय संस्कारांचा सर्वांत मोठा वाटा !

माझ्या कुटुंबात भारतीय मूल्यांचा वारसा आहे. हीच सर्वांत मोठी शिकवण आहे.- ‘नासा’तील भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञ स्वाती मोहन

वेब सीरिज आणि चित्रपट यांतून हिंदु धर्माचे वस्त्रहरण होत असतांना नाना पटोले झोपले होते का ? – अजयसिंह सेंगर, महाराष्ट्र करणी सेना

‘‘नाना हे सर्व प्रसिद्धीसाठी करत आहेत. अभिताभ बच्चन आणि अक्षयकुमार यांच्या चित्रपटांना करणी सेना संरक्षण देईल. पटोले यांच्या गुंडगिरीला त्याप्रमाणेच उत्तर देऊ.’’

अमेरिकेच्या दक्षिण भागात आलेल्या हिमवादळामुळे वीज, पाणी आणि अन्न यांविना लाखो लोकांचे प्रचंड हाल !

महासत्ता असलेल्या अमेरिकेला निसर्गाच्या तडाख्यासमोर हतबल व्हावे लागते, तेथे भारताची काय स्थिती होईल, याची कल्पना येते ! अशा आपत्काळात सुरक्षित आणि जिवंत रहाण्यासाठी साधना करून ईश्‍वरी कृपा संपादन करणेच आवश्यक !

हरिद्वार कुंभमेळ्यात सहभागी होणार्‍या काही संतांना हवेत सशस्त्र सुरक्षारक्षक !

अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष आणि महामंत्री यांच्यासहित ५ प्रमुख संतांना ‘वाय’ श्रेणीची सुरक्षा पुरवण्यात आली आहे, तर अन्य २६ संतांना सरकारी खर्चाने सशस्त्र सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत.