सांगली, २० फेब्रुवारी (वार्ता.) – येथील गोरक्षक श्री. अंकुश गोडसे यांनी भारतीय देशी गायी आणि गोशाळा स्वावलंबी करण्याच्या उद्देशाने स्वदेशी संकल्पनेतून गोमूत्र अर्क यंत्र निर्मिती चालू केली आहे. यातील पहिल्या टप्प्यातील बॉयलयरचे १९ फेब्रुवारी या दिवशी कुपवाड औद्योगिक वसाहत येथील एका कारखान्यात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या हस्ते पूजन करून उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी हुतात्मा राजीवभाई दीक्षित यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले.
या संदर्भात श्री. अंकुश गोडसे म्हणाले, ‘‘हे यंत्र गोशाळांना आर्थिकदृष्ट्या परवडणारे, वापरण्यास सोपे, दीर्घायुषी आणि स्टेनलेस स्टील या धातूपासून बनवण्यात आले आहे. गेल्या ५ वर्षात भारतभर जवळपास ५०० गोशाळांत अशा यंत्रांची स्थापना करण्यात आली आहे. येणार्या वर्षात ३०० गोशाळांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. याच क्षमतेचे सध्या बाजारात उपलब्ध असणारे यंत्र २२ सहस्र रुपयांना मिळते. ते हाताळण्यासाठी अवघड आहे. याउलट आपण सिद्ध केलेले यंत्र गोशाळांना १२ सहस्र रुपयांपर्यंत उपलब्ध करून देतो, तसेच या यंत्रामुळे एक लिटरही पाणी वाया जात नाही. याचा दुष्काळी भागात पुष्कळ मोठा लाभ होईल.’’
या वेळी भगीरथ पंचगव्यचे श्री. रवींद्र अडके, दत्त इंजिनिअर्सचे श्री. रूेश सूर्यवंशी, सर्वश्री केदार मजती, विरु मगदूम, सौ. अमृता गोडसे आणि श्रीमती स्वाती कुलकर्णी उपस्थिती होत्या.