कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर येथील शासकीय रुग्णालयातील नियमित शस्त्रकर्मे थांबवली !
कोरोना वाढत असतांना शस्त्रकर्म केल्यास त्या रुग्णालाही कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे नियमित शस्त्रकर्मे तात्पुरत्या थांबवण्यात आल्या आहेत.
कोरोना वाढत असतांना शस्त्रकर्म केल्यास त्या रुग्णालाही कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे नियमित शस्त्रकर्मे तात्पुरत्या थांबवण्यात आल्या आहेत.
सीमा सुरक्षा दलातील एका सैनिकाच्या पत्नीला कोरोनाची लागण झाल्यावर तिला उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यासाठी संबंधित सैनिक प्रयत्न करत आहे; मात्र एकाही रुग्णालयात खाट उपलब्ध नसल्याने त्याला बराच त्रास सहन करावा लागला.
रेमडेसिविर, तसेच ऑक्सिजन यांचा तुटवडा निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर टाटा उद्योग समूहाने पुढाकार घेत २०० ते ३०० टन ऑक्सिजनचा पुरवठा करण्यास प्रारंभ केला आहे. ‘टाटा ग्रुप’ने २४ ऑक्सिजन वाहक सिलेंडरची सुविधा परदेशातून आयात करण्याचे ठरवले आहे.
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाद्वारे सिद्ध करण्यात आलेल्या कोरोनावरील ‘कोविशिल्ड’ या लसीचा दर निश्चित करण्यात आला आहे. राज्यशासनासाठी प्रती लस रुपये ४००, तर खासगी रुग्णालयांसाठी प्रती लस रुपये ६०० असेल, अशी माहिती सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी दिली.
राज्यात १८ ते ४५ वर्षे वयोगटातील नागरिकांसाठी कोरोनावरील लसीकरणाची मोहीम वेगाने राबवण्याचा निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे, , अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांना दिली.
मीरा-भाईंदर शहरात रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याची माहिती मिळाल्यावर बोगस ग्राहक पाठवले असता १६ सहस्र रुपयांना इंजेक्शनची विक्री होत असल्याचे आढळले.
स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अर्धा घंटा ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्याने ६ रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. हा आरोप रुग्णालय प्रशासनाने फेटाळला. हे वृत्त ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीने दिले आहे.
ज्यांचे वय ४५ वर्षांपेक्षा अल्प आहे, त्यांची ‘आर्.टी.पी.सी.आर्.’ चाचणी ‘निगेटिव्ह’ असेल त्यांनाच घरपोच विक्रीसाठी सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेकडून ‘पास’ देण्यात येणार आहे.
‘रेमडेसिविर’च्या पुरवठ्यावर लक्ष ठेवण्याचा आदेश न्यायालयाने शासनाला द्यावा, अशी मागणीही याचिकाकर्त्याने केली आहे. कोरोनाच्या चाचणीचा अहवाल येण्यास २-३ दिवस विलंब होत आहे. त्यामुळे कोरोनावर उपचाराला विलंब होत आहे.
या कारवाईत पशूवधगृहातील तिघांना कह्यात घेतले असून इतर साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले.