२४ ऑक्सिजन वाहक सिलेंडरद्वारे २०० ते ३०० टन ऑक्सिजनचा पुरवठा करणार !

टाटा उद्योग समूहाचा निर्णय

मुंबई – रेमडेसिविर, तसेच ऑक्सिजन यांचा तुटवडा निर्माण झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर टाटा उद्योग समूहाने पुढाकार घेत २०० ते ३०० टन ऑक्सिजनचा पुरवठा करण्यास प्रारंभ केला आहे. ‘टाटा ग्रुप’ने २४ ऑक्सिजन वाहक सिलेंडरची सुविधा परदेशातून आयात करण्याचे ठरवले आहे. याविषयी ट्विटरवरून माहिती देण्यात आली.


या ट्वीटमध्ये ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व नागरिकांना केलेले आवाहन कौतुकास्पद आहे. आम्ही टाटा आस्थापनाकडून भारतातील आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी जे प्रयत्न शक्य आहेत, ते सर्व करण्यास कटीबद्ध आहोत. ऑक्सिजनच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे’, असे नमूद करण्यात आले अहे. ‘या लढाईत आम्ही आहोत आणि नक्कीच आपण जिंकू’, असेही टाटा स्टीलने म्हटले आहे.