संभाजीनगर येथे घाटी रुग्णालयातील ३ परिचारिकांवर ५० रुग्णांच्या सेवेचा भार !

गेल्या वर्षभरातील कोरोनाच्या संसर्गामुळे येथील घाटी रुग्णालयात रुग्णांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्या तुलनेत परिचारिकांची संख्या अल्प असल्यामुळे सध्या कार्यरत परिचारिकांवर कामाचा ताण वाढला आहे.

भिवंडी येथे पट्टेरी वाघाचे कातडे आणि पंजा यांच्या तस्करीसाठी आलेल्या चौघांना अटक

आरोपींकडून कातडे आणि ५ नखे असलेला पंजा जप्त करण्यात आला आहे.

सधन वर्गाने कोरोनावरील लस विकतच घ्यावी ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

१८ ते ४४ वर्षे या वयोगटातील सधन वर्गाने कोरोनावरील लसीचे डोस विकतच घेतले पाहिजेत, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केले आहे. लस कोणत्या घटकांना विनामूल्य द्यायची, याचा निर्णय घेण्यात येणार आहे.

रेमडेसिविरच्या साठेबाजांवर कडक कारवाई करणार ! – गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई

राज्यात कोरोनाचा उद्रेक झाला असून प्रत्येक जिल्ह्यात रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहेत. कोरोनावर उपाय असणार्‍या रेमडेसिविर इंजेक्शनचा जर कुणी साठा केला, तर त्याच्या विरोधात कडक कारवाई करण्यात येईल, अशी चेतावणी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.

कोयना आणि कृष्णा नदीच्या प्रीतिसंगमावर सापडला १८ व्या शतकातील अप्रकाशित शिलालेख

ग्रामदेवता श्री कृष्णामाईच्या मंदिराजवळील नारायणेश्‍वर मंदिराच्या भिंतीवर तो शिलालेख आहे.

अनिकेत कोथळे खून खटल्यातील संशयित पोलीस हवालदार अरुण टोणे यांचा मृत्यू !

पोलीस हवालदार अरुण टोणेना खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले असता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

निपाणी पोलिसांकडून कर्नाटक सीमा बंद : कोगनोळी पथकर नाका येथे कडेकोट बंदोबस्त !

कर्नाटक पोलिसांच्या या कृतीमुळे महाराष्ट्रवासियांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.