कोयना आणि कृष्णा नदीच्या प्रीतिसंगमावर सापडला १८ व्या शतकातील अप्रकाशित शिलालेख

कोयना आणि कृष्णा नदी प्रीतिसंगम

कर्‍हाड – येथील कोयना आणि कृष्णा नदीच्या प्रीतिसंगमावर १८ व्या शतकातील मंदिरांची संख्या अधिक आहे. त्या ठिकाणांचा अभ्यास करतांना संकेत फडके यांना अप्रकाशित शीलालेख आढळला. ग्रामदेवता श्री कृष्णामाईच्या मंदिराजवळील नारायणेश्‍वर मंदिराच्या भिंतीवर तो शिलालेख आहे. त्या शिलालेखाची भाषा मराठी असली, तरी त्याची लिपी देवनागरी आहे.

याविषयी संकेत फडके म्हणाले, इतिहासाचा अभ्यास करतांना ऐतिहासिक साधनांच्या स्वरूपात आढळणारे अनेक शिलालेख आहेत. ज्यांची माहिती अद्याप अप्रकाशित आहे. सध्या आढळलेल्या शिलालेखाच्या पहिल्या ओळींवर रंग लावला होता. काहीतरी लिहिलेले समजताच ज्येष्ठ इतिहास अभ्यासक के.एन्. देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली मित्रांच्या सहकार्याने शिलालेखाचा अभ्यास केला. शिलालेखाविषयी कुठेही मांडणी झालेली नाही. शिलालेखात मंदिरनिर्मितीचा उल्लेख आहे. त्यावरून तो शिलालेख वर्ष १८४७ ते १८४८ या काळात पूर्ण झाल्याचे स्पष्ट होते. शिलालेखाची लांबी ७०, तर रुंदी ४८ सेंटी मीटर आहे. शिलालेख ११ ओळींचा आहे. पहिल्या ओळींतील अक्षरे अस्पष्ट असूूून शिलालेखाचा अभ्यास इतिहासतज्ञ करत आहेत.