३ मास शिधावाटप केंद्रातून (रेशन दुकानातून) धान्य विकत न घेतल्यास शिधापत्रिका रहित होणार !

केंद्र सरकारचे म्हणणे आहे की, एखादी व्यक्ती ३ मास शिधावाटप केंद्रातून धान्य घेत नसेल, तर ती अन्य ठिकाणावरून शिधा घेण्यास सक्षम आहे. त्यामुळे अशांची शिधापत्रिका रहित करून त्यांना मिळणारा लाभ अन्य लोकांना देता येईल.

चर्चा घडवून न आणल्याने ‘शक्ती’ कायद्यावरील विधेयक हिवाळी अधिवेशनात मांडू नये ! – सौ. चित्रा वाघ, प्रदेश उपाध्यक्ष, भाजप

महिलांविषयी महत्त्वाच्या असणार्‍या ‘शक्ती’ कायद्यावरील महत्त्वाचे विधेयक हिवाळी अधिवेशनात मांडतांना विधेयकाचे प्रारूप किंवा त्यावर कोणतीही चर्चा सरकारने घडवून आणलेली नाही.

ओबीसींच्या आरक्षणाला हात लावाल, तर खबरदार ! – फडणवीस यांची चेतावणी

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ओसीबीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही, असा ठराव मंत्रिमंडळात करा. ओबीसींच्या आरक्षणात वाटेकरी स्वीकारला जाणार नाही, ही भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे.

महाराष्ट्रात जर अघोषित आणीबाणी असेल, तर देशात घोषित आणीबाणी आहे का ? – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार कधी पडेल किंवा सरकार कधी पडेल ? हे मुहूर्त शोधण्यात विरोधकांचे वर्ष गेले. सरकारने कोणती कामे केली आहेत, याकडे विरोधकांनी पाहिले नाही. सरकारने केलेल्या विकासकामांची आम्ही पुस्तिका काढली आहे. राज्य सरकारविषयी जनतेमध्ये कोणतीही अप्रसन्नता नाही…..

लाहोर येथील महाराजा रणजित सिंह यांच्या मूर्तीची तोडफोड

येथील न्यायालयात जून २०१९ मध्ये स्थापन करण्यात आलेली महाराजा रणजित सिंह यांच्या मूर्तीची एका तरुणाकडून तोडफोड करण्यात आली. त्याला तात्काळ अटक करण्यात आली.

प्रलंबित प्रश्‍न सोडवण्यासाठी माथाडी कामगारांचा आज बंद

स्वातंत्र्यानंतर आपल्याच शासनाच्या विरोधात ‘बंद’ करणे यात आपल्याच देशाची हानी आहे, हे लक्षात का येत नाही ?

विकास योजनेचा निधी कोरोनावरील उपाययोजनांकडे वळवण्याच्या केंद्रशासनाच्या निर्णयाला आव्हान देणार्‍या याचिकाकर्त्याला न्यायालयाकडून १ लाख रुपयांचा दंड

लोकसभा सदस्य स्थानिक क्षेत्र विकास योजनेचा निधी कोरोनाच्या विरोधात लढा देण्याकडे वळवण्याच्या केंद्रशासनाच्या निर्णयाला आव्हान देणार्‍या व्यक्तीला मुंबई उच्च न्यायालयाने १ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

खासदार शरद पवार यांचा वाढदिवस भाजपच्या वतीने ‘राष्ट्रीय भ्रष्टाचार दिन’ म्हणून साजरा

भारतीय जनता पक्ष संघटन सरचिटणीस श्री. दीपक माने म्हणाले, ‘‘यापुढे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या विरोधात अपमानास्पद वक्तव्य केल्यास त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल.’’

केक खाण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची व्यासपिठावर झुंबड

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यातील अनेक जिल्ह्यांत विविध उपक्रम साजरे करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनी परळी शहरात शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

भग्नावस्थेत असलेले चिंबल येथील ‘अवर लेडी ऑफ माऊंट कार्मेल चर्च’ वारसा स्थळ घोषित

गोवा शासनाने भग्नावस्थेत असलेले चिंबल येथील अवर लेडी ऑफ माऊंट कार्मेल चर्च (नोसा सेंनहोरा दो कार्मो) हे वारसा स्थळ घोषित केले आहे. या अनुषंगाने अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे.