प्रलंबित प्रश्‍न सोडवण्यासाठी माथाडी कामगारांचा आज बंद

स्वातंत्र्यकाळापूर्वी इंग्रजांशी लढण्यासाठी असहकार आंदोलन चालू झाले. ‘बंद’ करण्याची पद्धत ही पाश्‍चात्त्य देशातून आपल्याकडे आली. स्वातंत्र्यानंतर आपल्याच शासनाच्या विरोधात ‘बंद’ करणे यात आपल्याच देशाची हानी आहे, हे लक्षात का येत नाही ?

सौजन्य ABP माझा

नवी मुंबई – माथाडी कामगारांचे प्रलंबित प्रश्‍न सोडवण्यासाठी सरकारचे लक्ष वेधण्याकरिता १४ डिसेंबर या दिवशी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील माथाडी कामगार एक दिवसाचा लाक्षणिक बंद करणार आहेत, अशी माहिती माथाडी कामगारांचे नेते तथा महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे सरचिटणीस नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.


पाटील पुढे म्हणाले की, मागील १५ वर्षांत माथाडी कामगारांचे अनेक प्रश्‍न प्रलंबित आहेत. माथाडी मंडळावर आणि सल्लागार समितीवर सदस्यांच्या नियुक्त्या झालेल्या नाहीत. कामगार क्षेत्रात गुंडगिरी करणार्‍या टोळ्यांचा शिरकाव झाला आहे. संघटनांच्या नावाखाली खंडण्या वसूल केल्या जात आहेत. व्यवसायामध्ये परदेशी गुंतवणुकीला अनुमती मिळाल्यापासून कामगारांचे अस्तित्वही नष्ट होत चालले आहे.

या आंदोलनामध्ये मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीसह पुणे, नाशिक, कोल्हापूर, सातारा, तसेच अन्य ठिकाणचे माथाडी कामगारही सहभागी होणार आहेत.