आज रत्नागिरी येथे ‘जीवनदान ग्रुप’च्या माध्यमातून  रक्तदान शिबिराचे आयोजन

जिल्हा शासकीय रक्तपेढीच्या मागणीनुसार ‘जीवनदान ग्रुप’च्या माध्यमातून २६ मार्च या दिवशी रक्तदान शिबिराचे आयोजन नाचणे गोडाऊन स्टॉप येथे करण्यात आले आहे. यासाठी ५० रक्तदात्यांची सूची सिद्ध असल्याची माहिती ‘जीवनदान ग्रुप’कडून देण्यात आली आहे.

‘प्रगत’ भारतातील विदारक स्थिती !

‘जगात प्रत्येक ४० व्या सेकंदाला १ व्यक्ती स्वत:चेे आयुष्य संपवते, तर प्रत्येक ३ सेकंदाला १ जण आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतो. भारतात वर्षभरात सुमारे १ लक्ष लोक आत्महत्या करतात. त्यात १५ ते ३५ या वयोगटांतील तरुण वर्गाचे प्रमाण सर्वाधिक आहे.  

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरी कृती दलाची स्थापना ! – जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी जिल्ह्यातील सर्व शहरांमध्ये नागरी कृती दलाची स्थापना केली आहे. रत्नागिरी शहरातील प्रभागाचे नगरसेवक या दलाचे अध्यक्ष असतील.

द्राक्ष बागायतदार संकटात

कोरोनामुळे देश बंद झाल्याचा फटका जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदारांनाही बसत आहे. द्राक्ष वाहतुकीला राज्यबंदी झाल्यामुळे द्राक्षे बागेतच पडून राहून खराब होत आहेत.

दिंडोरी (नाशिक) येथे लाखो रुपयांचा अवैध ‘सॅनिटायझर’चा साठा जप्त

तालुक्यातील जवळके दिंडोरी शिवारातील एका ‘वेअर हाऊस’मधील आस्थापनात अवैध आणि अप्रमाणित ‘सॅनिटायझर’चा अनुमाने ८ लाख रुपयांचा साठा दिंडोरी पोलिसांनी जप्त केला असून अमित अलिम चंदानी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

देशभरात कोरोनाचे ५८८ रुग्ण, एकूण ११ जणांचा मृत्यू

देशभरात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ५६२ झाली असून आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे तमिळनाडू आणि देहली येथे प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. याचसमवेत देशाच्या वेगवेगळया भागातील कोरोनाची बाधा झालेले ४८ रुग्ण उपचारानंतर पूर्णपणे बरे झाले असून…

कोरोनामुळे जगभरात १९ सहस ६०७ जणांचा मृत्यू

कोरोनामुळे जगभरात मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या आता १९ सहस्र ६०७ झाली आहे. एकूण १७५ देशांत ४ लाख ३४ सहस्र ९८३ रुग्णांची नोंद झाली आहे. ही संख्या अजून जास्त असण्याची शक्यता जागतिक आरोग्य संघटनेने वर्तवली आहे. असे असले, तरी कोरोनाची लागण झालेले १ लाख ११ सहस्र ८७०…

देशात २१ दिवस संपूर्ण ‘दळणवळण बंदी’ लागू ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

देशात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे तो रोखण्यासाठी २४ मार्चला रात्री १२ वाजल्यापासून संपूर्ण देशात २१ दिवसांची (१४ एप्रिलपर्यंत) ‘दळणवळण बंदी’ (लॉकडाऊन) करण्यात येत आहे.

वर्तमानपत्रांमुळे कोरोनाचा संसर्ग होत नाही ! – जागतिक आरोग्य संघटना

वृत्तपत्रांमुळे कोरोना पसरण्याचा धोका अत्यंत अल्प आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. ‘एक अशी वस्तू जी अनेक ठिकाणी प्रवास करून आपल्यापर्यंत पोचते. म्हणजेच एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जातांना ती वस्तू वेगवेगळ्या तापमानामधून, परिस्थितीतून प्रवास करते.

चीनमधील यूनान प्रांतात ‘हंता’ विषाणूच्या प्रादुर्भावामुळे एकाचा मृत्यू

चीनमधून कोरोनाचे संकट न्यून होत असतांनाच येथील यूनान प्रांतामधील एका व्यक्तीचा ‘हंता’ विषाणूचा संसर्ग झाल्यामुळे मृत्यू झाला आहे. मृत झालेली व्यक्ती बसमधून कामावरून शाडोंग प्रांतामधून परत येत असतांना तिचा मृत्यू झाला. त्यामुळे बसमधील इतर ३२ प्रवाशांचीही चाचणी करण्यात आली आहे