एक मासाच्या आत आरोग्य विभाग परीक्षा घेऊन जागा भरेल ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

ही भरती आता सर्वांसाठी खुली करण्यात आली आहे. त्यामुळे मराठा समाजातील युवकांनी या संदर्भात काळजी करू नये. ‘रोस्टर’ कार्यवाहीसाठी थोडा वेळ लागेल; मात्र तेही लवकरच पूर्ण केले जाईल.

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे असणार !

भारताच्या वर्ष २०२१ च्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित रहाणार आहेत. प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी बोरिस जॉन्सन यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमंत्रित केले होते, अशी माहिती ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री डोमिनिक राब यांनी दिली आहे.

गॅस सिलिंडर ५० रुपयांनी महागला !

देशातील सर्वांत मोठे तेल आस्थापन असणार्‍या आय.ओ.सी.ने (इंडियन ऑईल कॉपरेशनने) दिलेल्या माहितीनुसार एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत ५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

अमली पदार्थांच्या प्रकरणी जामिनावर असलेल्या कन्नड अभिनेत्री संजल गुलरानी यांचे बलपूर्वक धर्मांतर

एवढेच नव्हे, तर त्यांचे ‘महिरा’ असे नामकरणही करण्यात आले आहे. त्याला पुरावा म्हणून नामकरण केल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे…

गोवा मुक्तीदिन कार्यक्रमाला उपस्थित न रहाण्याविषयी आमदार विजय सरदेसाई यांचे राष्ट्रपतींना पत्र

गोवा शासन राज्याचा ६० वा गोवा मुक्तीदिन वर्षभर मोठ्या स्वरूपात साजरा करणार आहे. १९ डिसेंबर २०२० या दिवशी गोवा मुक्तीदिनाच्या कार्यक्रमाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची उपस्थिती लाभणार आहे. ‘गोवा फॉरवर्ड’चा हा कार्यक्रम मोठ्या स्वरूपात साजरा करण्यास विरोध आहे.

मतदारसूचीत घोळ झाल्याची विरोधकांची निवडणूक आयोगाकडे तक्रार

मतदारांना माहिती न देताच त्यांची नावे मतदारसूचीतून गाळली जात आहेत किंवा समाविष्ट केली जात आहेत. विशेषत: मुरगाव तालुक्यात हा प्रकार आढळून आला, अशी तक्रार ‘गोवा फॉरवर्ड’ आणि काँग्रेस या पक्षांनी गोवा राज्य निवडणूक आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे केली आहे.

मराठा आरक्षणाविषयीची सरकारची भूमिका पालटलेली नाही ! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

आरक्षण देतांना अन्य समाजाचे आरक्षण काढण्यात येणार नाही, हे मी मुख्यमंत्री म्हणून सांगत आहे. मराठा आरक्षणाविषयी आधीच्या शासनाने जे अधिवक्ते नियुक्त केले होते, त्यांचीच नियुक्ती करण्यात आली आहे. आमची भूमिकाही पालटलेली नाही

भारताच्या शस्त्रसंधी कराराच्या कथित उल्लंघनावरून पाकने भारतीय राजकीय अधिकार्‍यांना जाब विचारला !

भारतीय सैन्याकडून शस्त्रसंधी कराराचे कथितरित्या उल्लंघन केल्यावरून पाकने तेथील भारतीय राजकीय अधिकार्‍यांना जाब विचारला.

सांगवे-कनेडी बाजारपेठेतील अवैध व्यवसाय बंद करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांची कणकवली पोलीस ठाण्यावर धडक

अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वतःहून अवैध व्यवसाय का बंद करत नाही ?

भूमीगत वीजवाहिनीच्या जागी असलेल्या ‘ट्रान्सफॉर्मर’पासून २ मीटर परिघात कचरा टाकणे टाळावे ! – वीज खात्याची सूचना

जनतेला शिस्त नाही आणि त्यामुळे अशी सूचना करावी लागते, हे दुर्दैवी आहेच; पण  संबंधित पालिका किंवा पंचायत प्रशासनानेही कचरा विल्हेवाटीची योग्य व्यवस्था केली, तर असे प्रसंग उद्भवणार नाहीत. त्यामुळे प्रशासनाने कुठे अल्प पडते ते पहावे !