लाहोर येथील महाराजा रणजित सिंह यांच्या मूर्तीची तोडफोड

लाहोर (पाकिस्तान) – येथील न्यायालयात जून २०१९ मध्ये स्थापन करण्यात आलेली महाराजा रणजित सिंह यांच्या मूर्तीची एका तरुणाकडून तोडफोड करण्यात आली. त्याला तात्काळ अटक करण्यात आली. तो येथील कट्टरतावादी इस्लामी प्रचारक खादिम हुसेन रिजवी याचा समर्थक आहे. खादिम याचा आरोप आहे की, महाराजा रणजितसिंह यांनी मुसलमानांच्या हत्या केल्या होत्या.

वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक