
सांगली, १३ डिसेंबर (वार्ता.) – माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रीय बेरोजगार दिवस म्हणून साजरा केला. त्यामुळे त्याला प्रत्युत्तर म्हणून १२ डिसेंबर या दिवशी खासदार शरद पवार यांचा ८० वा वाढदिवस भाजपच्या वतीने ‘राष्ट्रीय भ्रष्टाचार दिन’ म्हणून साजरा करण्यात आला. मथुबाई गरवारे कन्या शाळा येथे हा दिवस साजरा करतांना भारतीय जनता पक्ष संघटन सरचिटणीस श्री. दीपक माने म्हणाले, ‘‘यापुढे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या विरोधात अपमानास्पद वक्तव्य केल्यास त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल.’’

या वेळी सर्वश्री राहुल माने, अमित भोसले, राजू मद्रासी, सोहम जोशी, अनिकेत खिलारे, शुभम कांबळे, ऋषी माने, रमेश पुजारी, शुभम माने, प्रकाश मद्रासी, राहुल घोडकिया, तसेच अन्य उपस्थित होते.
चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना मिळालेला जामीन रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
Waqf Board Scam : समाजवादी पक्षाच्या सत्ताकाळात ‘वक्फ बोर्डा’च्या भूमींमध्ये अब्जावधी रुपयांचा घोटाळा ! – मौलाना शहाबुद्दीन रिझवी बरेलवी
राज्यातील ८ सहस्रांहून अधिक शिक्षकांचे एका दिवसाचे वेतन कापले !
मुंबईवरील २६/११ चे आक्रमण काँग्रेस आणि आय.एस्.आय. यांनी एकत्र घडवून आणले ! – R.V.S. Mani
९० सहस्र रुपयांची लाच स्वीकारणार्या पोलिसाला अटक
मुंब्रा येथे ४० सहस्र बोगस मतदारांची नावे घुसवण्याचे काम चालू !