मुंबई-गोवा महामार्ग प्रकल्पबाधितांचे प्रश्‍न त्वरित न सुटल्यास टोकाची भूमिका घ्यावी लागेल ! – आमदार नितेश राणे यांची प्रशासनाला चेतावणी

तिलारी धरण, अरुणा धरण प्रकल्प या सर्व ठिकाणच्या प्रकल्पबाधितांचे प्रश्‍न गेली कित्येक वर्षे सुटलेले नाहीत, तर ५ वर्षांमागील प्रकल्पबाधितांचे प्रश्‍न काय सुटणार ?

आगामी विधानसभा निवडणुकीत मगो भाजपशी युती करणार नाही !

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपशी युती करण्याची शक्यता महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे अध्यक्ष श्री. दीपक ढवळीकर यांनी नाकारली आहे.

मगो पक्षाच्या अध्यक्षपदासाठी जानेवारी २०२१ मध्ये निवडणूक

जानेवारी २०२१ मध्ये पक्षाचे अध्यक्षपद आणि समितीचे इतर सदस्य यांसाठीची निवडणूक घेण्यात येईल, अशी माहिती मगो पक्षाचे अध्यक्ष श्री. दीपक ढवळीकर यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘निवडणुकीसाठी कार्यक्रम ठरवण्यात आला आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा मराठी पत्रकार संघाचे पुरस्कार घोषित

कै. अरविंद शिरसाट यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ यावर्षी दोडामार्गमधील तेजस देसाई यांना जिल्हा पत्रकार संघाचा पुरस्कार घोषित झाला आहे.

गोव्यात नवीन ९० कोरोनाबाधित

गोव्यात २४ डिसेंबरला ९० नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत. कोरोनामुळे दिवसभरात १ मृत्यू झाला आहे, तर ८८ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंतचे एकूण मृत्यू ७२८ झाले आहेत.

देहली विमानतळावरून खलिस्तानी आतंकवाद्याला अटक

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (‘एन्.आय.ए.’ने) गेल्या काही वर्षांपासून पसार असणार्‍या खलिस्तानी आतंकवादी गुरजीतसिंह निज्जर याला देहली विमानतळावरून अटक केली. वर्ष २०१७ मध्ये निज्जर सायप्रस या देशामध्ये पळून गेला होता.

ब्रिटनहून आलेले ५ कोरोनाबाधित प्रवासी विमानतळावरून पसार

ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवीन विषाणू सापडल्याने जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे भारतासह अनेक देशांनी ब्रिटनसमवेतची विमान वाहतूक स्थगित केली आहे. त्यापूर्वी ब्रिटनमधून आलेल्या प्रवाशांपैकी ५ कोरोना पॉझिटिव्ह (सकारात्मक) रुग्णांनी देहली विमानतळावरूनच पलायन केल्याची घटना घडली.

कोरोनाच्या संसर्गाच्या कारणामुळे एल्गार परिषदेला पुणे पोलिसांनी अनुमती नाकारली

केवळ कोरोनामुळेच नव्हे, तर यापूर्वी एल्गार परिषदेनंतरचा हिंसक इतिहास सर्वश्रुत असल्याने तिला कधीच अनुमती द्यायला नको, असेच जनतेला वाटते !

श्री महालक्ष्मीदेवीच्या खजिन्यात ६४ लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची भर !

करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीदेवीच्या खजिन्यात आता आणखी ६४ लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची भर पडली आहे. एप्रिल २०१९ ते मार्च २०२० पर्यंत देवीला अर्पण झालेल्या दागिन्यांच्या मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.