भाग्यनगर (तेलंगाणा) येथे ३ आतंकवाद्यांना अटक

दसर्‍याला भाजप आणि रा.स्व. संघ यांच्या कार्यक्रमांत हातबाँब फेकून करणार होते आक्रमण !

‘आदिपुरुष’ या चित्रपटात प्रभु श्रीरामाच्या पराक्रमी स्वरूपाचे दर्शन घडणार ! – दिग्दर्शक ओम राऊत

‘आदिपुरुष’ हा चित्रपट हिंदी आणि तेलुगु या भाषांमध्ये बनवण्यात आला आहे. यासह हाच चित्रपट तामिळ, कन्नड, मल्याळम्, मराठी, बंगाली आणि उडिया या भाषांमध्येही बनवण्याचीही सिद्धता चालू आहे.

भारतीय वायूदलात स्वदेशी बनावटीच्या ‘लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर्स’चा समावेश

सुमारे ३ सहस्र ८८५ कोटी रुपये खर्चून तयार केलेली १५ हेलिकॉप्टर्स वायूदलात सामील होत आहेत.

गोवा : डिचोली येथे श्री दुर्गामाता दौड आणि हिंदु राष्ट्र उभारणीची शपथ !

माता जगदंबेची अखंड कृपा संपादन करण्यासाठी आणि हिंदु राष्ट्र उभारणीसाठी एक शक्तीचा स्रोत या संपूर्ण परिसरात पसरला आहे, असेच चित्र दिसत होते. नवरात्रोत्सवातील साक्षात श्री दुर्गादेवीचे दर्शनच उपस्थित भाविकांनी अनुभवले !

गोव्यात १ ऑक्टोबरपासून पाणीदेयकात ५ टक्के वाढ

सर्व प्रकारच्या पाणीदेयकांत ही वाढ होणार असून पुढे प्रत्येक आर्थिक वर्षाच्या प्रारंभी पाणीदेयकात वाढ होणार आहे. आता केलेल्या दरवाढीमुळे सध्याच्या वाढत्या महागाईत नागरिकांना आणखी एका संकटाला सामोरे जावे लागणार आहे.

गोवा : अमली पदार्थ तस्कराकडून लाच घेणारे २ पोलीस निलंबित

गोव्यातील अमली पदार्थांचा व्यवसाय कारवाईनंतरही आटोक्यात का येत नाही ? हे पुन्हा एकदा उघड झाले ! कुंपणच शेत खात असेल, तर गोव्याला लागलेला ‘अमली पदार्थांचे ठिकाण’ हा ठपका कधीतरी पुसला जाईल का ?

आगरा (उत्तरप्रदेश) येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकर्‍यांकडून लाल किल्ल्यापर्यंत दुर्गामाता दौड

हिंदूंमध्ये विशेषतः युवकांमध्ये शौर्य अन् भक्तीचे जागरण व्हावे; म्हणून ‘श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’चे पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिवर्षी नवरात्रीमध्ये ९ दिवस ‘दुर्गामाता दौडी’चे आयोजन केले जाते.

मुंबई विमानतळावरील विमान बाँबद्वारे उडवण्याची धमकी !

सोमालिया देशातून हा संदेश पाठवण्यात आला होता. धमकीच्या ईमेलनंतर स्थानिक पोलिसांसह आतंकवादविरोधी पथक, बाँबशोधक आणि नाशक पथक यांनी विमानाची पडताळणी केली.

प्रत्येक हिंदूने जागरूक होऊन ‘हलाल जिहाद’ला विरोध करणे आवश्यक ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

२८ सप्टेंबरला ‘हमारा देश’ संघटनेच्या वतीने हॉटेल उदय भवन येथे ‘हलाल जिहाद’वर आयोजित कार्यक्रमात बोलत होते. या प्रसंगी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

बेळगाव येथे हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशकपूर्तीच्या निमित्ताने ‘हिंदु राष्ट्र’ यावर विशेष परिसंवाद !

या परिसंवादामध्ये हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी ‘हिंदु राष्ट्र आणि हलाल जिहाद’ या विषयांवर मार्गदर्शन केले. या परिसंवादामध्ये विविध संघटनांचे कार्यकर्ते आणि धर्मप्रेमी सहभागी झाले होते.