मुंबईवर हक्क सांगण्याच्या भानगडीत पडू नका ! – उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना

मुंबईकरांनी २५ वर्षे विश्वास दाखवला. कसाबचे आक्रमण असा वा नैसर्गिक आपत्ती असो शिवसैनिकांनीच साहाय्य केले आहे; परंतु ज्यांना शिवसेनेने मोठे केले, ज्या सेनेने पदे दिली, त्यांनीच दगा केला, असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले.

खोटे आरोप करणार्‍यांवरील कारवाई घोषित करण्याची राज्य सरकारकडे मागणी

पत्राचाळ प्रकरणातील आरोपांवर शरद पवार यांची प्रतिक्रिया

बदलापूर येथील शिवसेनेच्या माजी नगरसेवकावर आक्रमण !

बदलापूर शहरातील शिवसेनेचे माजी नगरसेवक अविनाश मोरे यांच्यावर २० सप्टेंबरच्या रात्री ५ जणांनी बंदुकीचा धाक दाखवत आक्रमण केले. त्यात मोरे यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना बदलापूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील तरुणवर्गाचे आर्थिक खच्चीकरण चालू आहे ! – आदित्य ठाकरे, शिवसेना

वर्सोवा-वांद्रे सी लिंकच्या कामामध्ये सरकारने कंपनी आणि कॉन्ट्रॅक्टर पालटले आहेत. या कंपनीत नोकरीसाठी मुलाखतीचे आयोजन चेन्नई येथे ठेवण्यात आले.

आम्ही बाळासाहेबांचे खंदे लढवय्ये  ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

राज्यात मोठे परिवर्तन झाले. जगातील ३३ देशांची याची नोंद घेतली. हा उठाव होता. हा संघर्ष सत्तेसाठी नव्हता.   नगरसेवकही सत्ता सोडत नाही. आम्ही सत्तेचा त्याग करून गेलो. आम्ही मिंधे नव्हे, तर बाळासाहेबांचे खंदे लढवय्ये आहोत, असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देहली येथे केले.

श्री विठ्ठल मंदिरातील कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांचे तात्काळ निलंबन करावे ! – राष्ट्रीय वारकरी परिषद

श्री विठ्ठल मंदिरात भजन आणि कीर्तन करण्यास बंदी घातल्याचे प्रकरण

हिंदु राष्ट्र संघटनेच्या अध्यक्षांवर आक्रमणप्रकरणी ३ पोलिसांवर निलंबनाची कारवाई !

तुषार हंबीरे यांच्यावर आक्रमण झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ ८ आरोपींना अटक केली आहे. त्यांची चौकशी केली असता जुन्या प्रकरणाच्या रागातून हे आक्रमण केल्याची माहिती समोर आली आहे.

जे.एन्.पी.टी. बंदरातून २० सहस्र किलो अमली पदार्थ जप्त !

इतक्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांचा व्यवसाय करण्यात येतो आणि सुरक्षा यंत्रणांना त्याविषयीची माहिती कशी मिळत नाही ?

रेल्वेस्थानकांत आतंकवादी शिरल्याचा दूरभाष करणार्‍या आरोपीला अडीच मासांनी अटक

एखाद्या गुन्हेगाराला शोधून काढण्यास अडीच मास लावणारे पोलीस देशांतर्गत लपून बसलेल्या शेकडो आतंकवाद्यांचा बिमोड करण्यास किती वर्षे लावणार ?

चंद्रभागेसह इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी अखिल भाविक वारकरी मंडळाच्या बैठकीत ठराव !

येथील रंगभवन चौकातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक पार पडली. बैठकीच्या अध्यक्षपदी ह.भ.प. दत्तात्रय महाराज क्षीरसागर होते.