‘आदिपुरुष’ या चित्रपटात प्रभु श्रीरामाच्या पराक्रमी स्वरूपाचे दर्शन घडणार ! – दिग्दर्शक ओम राऊत

मुंबई – प्रभु श्रीरामावर बनवलेल्या बहुतेक दूरदर्शन मालिका आणि चित्रपटातील कथा यांमध्ये श्रीरामाला ‘मर्यादा पुरुषोत्तम’ दाखवण्यात आले आहे; परंतु ‘आदिपुरुष’ या चित्रपटात प्रभु श्रीरामाच्या पराक्रमी स्वरूपाचे दर्शन घडवणार आहे, असे या  चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत यांनी सांगितले.

‘आदिपुरुष’ हा चित्रपट हिंदी आणि तेलुगु या भाषांमध्ये बनवण्यात आला आहे. यासह हाच चित्रपट तामिळ, कन्नड, मल्याळम्, मराठी, बंगाली आणि उडिया या भाषांमध्येही बनवण्याचीही सिद्धता चालू आहे. इतकेच नव्हे, तर हा चित्रपट इंग्रजी, चिनी, कोरियन, जपानी आणि इतर भाषांमध्ये बनवण्याचाही प्रस्ताव आहे. या चित्रपटाचे विज्ञापन नुकतेच प्रदर्शित झाले. ‘आदिपुरुष’ हा चित्रपट अनुमाने ५०० कोटी रुपये खर्चून बनवला असून तो हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वांत महागडा चित्रपट आहे.