अर्थसंकल्पात घोषणा; मात्र अद्याप ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या निधीत वाढ नाही !

अर्थसंकल्पीय अधिवेशनात ९ मार्च या दिवशी विधीमंडळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेची मर्यादा वाढवण्यात आली असल्याची घोषणा केली

आक्षेपार्ह लिखाणाप्रकरणी हिंगोली पोलिसांकडून १४८ जणांना नोटिसा !

भडक, जातीय तेढ निर्माण करणार्‍या, शांतता भंग करणार्‍या ‘पोस्ट’वर लक्ष ठेवण्यात येत आहे. आक्षेपार्ह छायाचित्र किंवा व्हिडिओ पुढे पाठवणे, ते प्रसारित करणे, आवडल्याचे सांगणे यांवर त्वरित माहिती काढून संबंधितांवर थेट कारवाई करण्यात येत आहे.

कासेगाव (जिल्हा सोलापूर) येथे शंभु महादेव कावड यात्रा उत्साहात पार पडली !

शिखर शिंगणापूर येथे शंभु महादेवाचे मंदिर बांधणार्‍या राजा सिंघणदेव यांच्या कार्यकाळात त्यांचे प्रधान हेमाद्रीपंत यांच्या मार्गदर्शनाखाली कासेगाव (तालुका दक्षिण सोलापूर) येथे शिंगणापूरसारखीच रचना असणारे मंदिर बांधण्यात आले.

गडदुर्गांवरील पर्यटनापेक्षा त्यांचे जतन- संवर्धन अधिक महत्त्वाचे ! – छत्रपती संभाजीराजे

भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाल्यानंतरही राज्यातील गडदुर्गांकडे आपले दुर्लक्ष झाले आहे. सर्व राजकीय पुढारी केवळ छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे गडदुर्ग यांची नावे घेतात; मात्र प्रत्यक्षात त्यांचे जतन आणि संवर्धन यांसाठी कुणीच काही प्रयत्न करत नाही.

पुणे येथील भंगारात निघणार्‍या जुन्या सरकारी वाहनांची संख्या ६० टक्क्यांनी अल्प !

या वाहनांचा आकडा अनुमाने २ सहस्र होता; परंतु प्रत्यक्ष पडताळणी केल्यानंतर हा आकडा ६० टक्क्यांनी न्यून होऊन केवळ ८५६ वाहनेच भंगारामध्ये काढली जातील, अशी माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आर्.टी.ओ.) सूत्रांनी दिली आहे.

सातारा जिल्ह्यातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा ‘पुष्कळ चांगले’ (व्हेरी गुड) श्रेणीत समावेश !

यापूर्वी वर्ष २०१०, २०१४, २०१८ आणि २०२२ मध्ये मूल्यांकन झाले. वर्ष २०२२ मध्ये झालेल्या मूल्यांकनानुसार पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव सातारा जिल्ह्यातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्प ‘पुष्कळ चांगले’ (व्हेरी गुड) श्रेणीत आले आहे.

पुण्यातील वेताळ टेकडी वाचवण्यासाठी ‘लाँग मार्च’ !

त्या रस्त्याचा १५ टक्केही नागरिक वापर करणार नसल्याचा अहवाल समोर आला आहे; परंतु हा रस्ता करण्यास प्रशासन का हट्ट करत आहे ?

मुख्यमंत्र्यांच्या चरित्र ग्रंथाचा प्रकाशन सोहळा पुढे ढकलला !

निरूपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान समारंभात काही श्री साधकांचे उष्माघातामुळे निधन झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे.

सातारा येथील राधिका चौकातील नवीन रस्त्याला भगदाड !

निकृष्ट रस्त्यामुळे ठेकेदारावर कारवाईसाठी नागरिकांना वाट का पहावी लागते ? प्रशासनाने चौकशी करून तात्काळ कारवाई करणे आवश्यक आहे.

खडकवासला धरणाच्या पाण्यात अस्थी विसर्जन !

लाखो नागरिकांच्या आरोग्याशी आणि जिवाशी खेळणार्‍यांवर तातडीने कारवाई केली पाहिजे. त्यांना कठोर शिक्षा करून यापुढे असे प्रकार घडणार नाहीत, याची काळजीही घ्यायला हवी.