छत्रपती संभाजीनगर येथील विद्यार्थिनीवर अत्‍याचार करणारा प्राध्‍यापक निलंबित !

शहरातील एका महाविद्यालयात पदव्‍युत्तर शिक्षण घेणार्‍या विद्यार्थिनीवर साहाय्‍यक प्राध्‍यापक अशोक बंडगर याने बलात्‍कार केल्‍याची घटना २५ एप्रिल या दिवशी उघडकीस आली होती.

भूसंपादनासाठी मोबदला न देता ११ घरे पाडली !

मुंबई-वडोदरा महामार्गाच्‍या भूसंपादनासाठी पालघर जिल्‍ह्यातील धानिवरी येथील ११ घरे भूमीचा मोबदला न देता प्रशासनाने पाडल्‍याचा धक्‍कादायक प्रकार पुढे आला आहे.

पिंपरी (पुणे) महापालिकेच्या प्राथमिक शाळांतील ‘ई क्लासरूम’ योजना बंदस्थितीत

महापालिकेच्या शाळांमध्ये संगणक, विज्ञान आणि गणित यांच्या वर्गखोल्या सिद्ध करण्यात आल्या. शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले. प्रारंभीचे काही दिवस सोडल्यास अनेक तांत्रिक अडचणींमुळे ‘ई लर्निंग’ सध्या बंद पडल्याचे दिसून येत आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या १०० व्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचे राज्यभर प्रक्षेपण करणार ! – भाजप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ष २०१४ मध्ये देशाची सूत्रे हाती घेताच प्रत्येक मासाच्या शेवटच्या रविवारी देशवासियांशी संवाद साधण्यासाठी ‘मन की बात’ या कार्यक्रमास प्रारंभ केला. येत्या रविवारी त्याचा १००वा भाग प्रक्षेपित होत आहे त्या निमित्ताने . . .

गोव्यात समुद्रकिनार्‍यांवर पर्यटकांकडून सुरक्षेसंबंधी सूचनांचे सर्रासपणे उल्लंघन

सुरक्षेसंबंधी सूचनांकडे दुर्लक्ष केल्याने गोव्यातील समुद्रकिनार्‍यांवर विविध घटनांमध्ये ३६ जणांचा बुडून मृत्यू ! यामध्ये चालू वर्षाच्या ४ मासांत ६ जणांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटनांचाही समावेश आहे. सर्व घटनांमध्ये बहुतांश देशी पर्यटकांचा समावेश आहे.

कॉ. गोविंद पानसरे यांच्‍याकडील जप्‍त केलेल्‍या ‘डायरी’ची प्रत संशयितांना मिळाली पाहिजे ! – अधिवक्‍ता अमोघवर्ष खेमलापुरे

कॉ. गोविंद पानसरे यांची हत्‍या झाल्‍यावर त्‍यांच्‍याकडे असलेली डायरी पोलीस प्रशासनाच्‍या वतीने जप्‍त करण्‍यात आली होती. या जप्‍त केलेल्‍या ‘डायरी’ची प्रत मिळावी, असे आवेदन न्‍यायालयीन प्रशासनाकडे संशयितांच्‍या अधिवक्‍त्‍यांनी केले आहे.

कोंढवा (पुणे) येथे ४ गोवंशियांची अवैध वाहतूक करणार्‍या सराईत धर्मांध गोतस्‍करावर गुन्‍हा नोंद !

नेहमी गोवंशियांच्‍या कत्तलीची माहिती गोरक्षकांना मिळते, याचा पोलीस विचार करतील का ? – संपादक

श्रीराम आणि श्रीकृष्ण समजून घेतल्यास समर्थ भारत घडेल ! – शरद पोंक्षे, प्रखर हिंदुत्वनिष्ठ अभिनेते 

जगातील सर्व देश महासत्ता होण्यासाठी धडपडतात; परंतु एकमेव भारत देश ‘विश्वगुरु’ होण्यासाठी धडपडत आहे. शस्त्रांच्या आधारावर महासत्ता बनता येऊ शकते; मात्र ‘विश्वगुरु’ होण्यासाठी संस्कार आणि सनातन संस्कृती लागते.

बारसू येथील भूमीपुत्रांना विश्‍वासात घेऊन प्रकल्‍प पुढे नेणार ! – एकनाथ शिंदे, मुख्‍यमंत्री

जिल्‍ह्यातील बारसू येथील भूमीपुत्रांना विश्‍वासात घेऊनच प्रकल्‍प पुढे नेऊ. येथील लोकांवर दबावतंत्राचा वापर करणार नाही, असे आश्‍वासन मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २७ एप्रिल या दिवशी येथे पत्रकारांशी बोलतांना दिले.

मंत्रालयासह शासकीय कार्यालयांमध्‍ये कामकाज किती परिणामकारक होते ? याचे मूल्‍यांकन होणार !

क्‍वालिटी कौन्‍सिल ऑफ इंडिया’ या स्‍वायत्त संस्‍थेकडून हे मूल्‍यांकन करण्‍यात येणार आहे.