कोंढवा (पुणे) येथे ४ गोवंशियांची अवैध वाहतूक करणार्‍या सराईत धर्मांध गोतस्‍करावर गुन्‍हा नोंद !

दौंड (जिल्‍हा पुणे) – येथून कोंढवा येथील मलंग कुरेशी याच्‍याकडे गोवंशियांच्‍या कत्तलीसाठी अवैध वाहतूक होणार आहे, अशी माहिती गोरक्षकांना मिळाली होती. (नेहमी गोवंशियांच्‍या कत्तलीची माहिती गोरक्षकांना मिळते, याचा पोलीस विचार करतील का ? – संपादक) त्‍यानुसार अक्षय कांचन आणि त्‍यांचे सहकारी गोरक्षक सर्वश्री ऋषिकेश कामथे, राहुल कदम, विशाल राऊत, अनिरुद्ध लष्‍करे, कुणाल रेवडे, रवींद्र पडवळ हे २६ एप्रिल या दिवशी महादेवनगर येथे गेले. त्‍या वेळी त्‍यांना आसिफ सय्‍यद याचे संशयित वाहन भरधाव वेगाने वाघोलीकडे निघाल्‍याचे आढळून आले. या वेळी वाहनामध्‍ये २ गायी आणि २ बैल दाटीवाटीने कोंबून बांधलेल्‍या अवस्‍थेत होतेे. याविषयी पोलिसांना कळवले असता, पोलिसांच्‍या साहाय्‍याने कारवाई करून ५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्‍त करण्‍यात आला आहे. या प्रकरणी अक्षय कांचन यांनी तक्रार दिली असून लोणीकंद पोलीस ठाण्‍यात आसिफ सय्‍यद याच्‍यावर गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे. सर्व जनावरे सरसेनापती हंबीरराव मोहिते गोशाळा येथे सुखरूप सोडण्‍यात आली आहेत.

संपादकीय भूमिका

दिवसा ढवळ्‍या गोवंशीय आणि गोमांस यांची अवैध वाहतूक करणार्‍या धर्मांध गोतस्‍करांचा पोलिसांनी कायमचा बंदोबस्‍त करावा आणि प्रतिदिन होणार्‍या गोहत्‍या थांबवाव्‍यात ! ही कार्यतत्‍परता पोलीस कधी दाखवणार ?