‘पेड न्यूज’प्रकरणी भाजपच्या अश्विनी जगताप यांना निवडणूक आयोगाची नोटीस !

अश्विनी जगताप यांच्याविषयीची एक बातमी ‘न्यूज पोर्टल’ आणि एका साप्ताहिकात प्रकाशित करण्यात आली होती. हे एकूणच लिखाण ‘पेड न्यूज’सारखे असल्याचे एम्.सी.एम्.सी. समितीच्या निदर्शनास आले होते.

एस्.आर्.ए. घोटाळा प्रकरणी आरोपपत्र प्रविष्ट न करण्याचे निर्देश !

मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा

नवी मुंबई महानगरपालिका वृक्षगणनेसाठी ३ कोटी ५० लाख रुपये खर्च करणार !

महापालिका आणि विविध पर्यावरणवादी संस्था यांच्या माध्यमातून सहस्रो वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे या वर्षी वृक्षगणना झाल्यावर निश्चितच दीड कोटीहून अधिक वृक्ष असतील, असा विश्वास पर्यावरणवाद्यांनी व्यक्त केला आहे.

जलतरण तलाव नूतनीकरणाचे सातारा जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांच्या हस्ते उद्घाटन !

१ कोटी ३५ लाख रुपये व्यय करून जलतरण तलाव, फिल्टरेशन प्लाँट आणि इतर गोष्टी यांचे नूतनीकरण झाल्यानंतर जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. आता हा जलतरण तलाव सर्वांसाठी खुला करण्यात आला आहे.

सैदापूर (जिल्हा सातारा) येथील जुगार अड्ड्यावर पोलिसांकडून धाड !

अल्पसंख्यांक गुन्हेगारीत मात्र बहुसंख्यांक ! १६ लाख २६ सहस्र रुपयांचा मुद्देमाल शासनाधीन

पनवेल येथे १२ वीतील विद्यार्थ्याची अभ्यासाच्या तणावामुळे आत्महत्या !

विद्यार्थ्यांनो, इतके टोकाचे पाऊल उचलण्यापेक्षा तणाव निर्मूलनासाठी प्रयत्न करा ! मेकॉलेप्रणित शिक्षणप्रणालीमुळे तणावाला सामोरे न जाणार्‍या पिढीसाठी लवकरात लवकर धर्मशिक्षणाची सोय होणे अपेक्षित !

पुणे येथील आद्यक्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचे स्मारक दुर्लक्षित !

बंडगार्डन पुलाजवळील एका पुरातन इमारतीच्या आवारामध्ये आद्यक्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचे स्मारक उभारले आहे; परंतु ते स्मारक सध्या अनेक समस्यांनी ग्रस्त होऊन दुर्लक्षित झालेले दिसून येत आहे.

सावकारीच्या माध्यमातून लहान मुलीला ओलीस ठेवणार्‍या दांपत्यासह एक जण तडीपार !

संजय बाबर, अश्विनी संजय बाबर आणि संकेत राजे यांच्यावर शहर पोलीस ठाण्यात खासगी सावकारीचा गुन्हा नोंद झाला होता. पोलिसांनी त्यांना अटक केल्यानंतर त्यांची जामिनावर सुटका झाली होती.

कराड येथील कापड दुकानदारांची १ लाख २५ सहस्र रुपयांची ऑनलाईन फसवणूक !

येथील बाजारपेठेतील कापड दुकानदारांची भाग्यनगर (हैद्राबाद) येथील युवकाने १ लाख २५ सहस्र रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी कराड शहर पोलिसांनी शहेनशहा शरीफ शेख यांना अटक केली असून कापड व्यापारी अभिषेक जैन यांनी पोलिसात तक्रार प्रविष्ट केली होती.

‘पंचमहाभूत बोध’ प्रयोगात मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांनी घेतली पंचतत्त्वांच्या संरक्षणाची शपथ !

प.पू. काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या संकल्पनेतून निर्माते दिग्दर्शक विजू माने यांनी सिद्ध केलेल्या या प्रयोगाचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. केवळ २० मिनिटांत ५० कलाकारांच्या सहभागातून हा प्रयोग सादर करण्यात आला आहे.