महानगरपालिकेत तक्रारपेटीच नाही, नागरिकांच्‍या तक्रारीवर सामाजिक माध्‍यमांवरही प्रतिसाद नाही !

नागरिकांच्‍या तक्रारींची नोंद न घेणारे अकार्यक्षम महापालिका प्रशासन बरखास्‍त करणे योग्‍य नव्‍हे का ?

नागपूर ‘बायपास’वर ट्रकचालकांकडून प्रवेश शुल्‍कच्‍या नावावर अवैध वसुली !

उपप्रादेशिक निरीक्षकासह २ दलालांना अटक !

स्‍वस्‍त धान्‍य दुकानदार संघटनेचा ‘डीबीटी’ प्रणालीला विरोध !

उन्‍हाळी अधिवेशनापूर्वी राज्‍यात आंदोलन करण्‍याचा निर्णय !

संभाजीनगर खंडपिठाने कान उपटताच सेवकांचे वेतन ८ सहस्र रुपये केले !

गेल्‍या १७ वर्षांपासून सरकारने केली नव्‍हती वेतनात वाढ !

अतिक्रमणविरोधी कारवाई करणार्‍या महापालिकेच्‍या अधिकार्‍यांना जमावाकडून मारहाण

अतिक्रमणाचा गुन्‍हा करूनही अधिकार्‍यांना मारहाण करणार्‍यांना कायद्याचा धाक राहिला नाही का ? अशांना कठोर शिक्षाच हवी !

पुणे पोलिसांकडून वर्ष २०२२ मध्‍ये जप्‍त केलेल्‍या अमली पदार्थांचा साठा नष्‍ट

शहरातील अमली पदार्थांची तस्‍करी करणार्‍यांकडून वर्ष २०२२ मध्‍ये जप्‍त केलेल्‍या ७६१ किलो अमली पदार्थांना आग लावून पोलिसांकडून ते भस्‍मसात् करण्‍यात आले.

उंटुरुकट्टे कैमर (कर्नाटक) येथील शासकीय शाळेतील ‘मुलांचा बाजार मेळाव्‍या’त सनातनच्‍या बालसाधिकेचा सहभाग

प्राथमिक शाळेत ‘मुलांचा बाजार मेळाव्‍या’चे आयोजन करण्‍यात आले होते. यात सनातन संस्‍थेचे साधक श्री. हरिश यांची कन्‍या कु. बिंबिता हिने सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्‍पादने यांचे प्रदर्शन लावले होते.

कुराण जाळणार्‍या स्‍विडनऐवजी अल्लाकडून तुर्कीयेला शिक्षा ! – तस्‍लिमा नसरीन

इस्‍लामवादी म्‍हणत होते, ‘अल्ला स्‍विडनला शिक्षा देईल’; कारण स्‍विडनमधील लोक कुराण जाळत होते; पण त्‍याऐवजी अल्लाने तुर्कीयेला शिक्षा दिली.

‘इस्रो’च्‍या सर्वांत लहान रॉकेटचे यशस्‍वी प्रक्षेपण

भारतीय अंतराळ संशोधन संस्‍था अर्थात् ‘इस्रो’ने ‘एस्.एस्.एल्.व्‍ही.-डी २’ या नवीन ‘स्‍मॉल सॅटेलाइट लॉन्‍चिंग व्‍हेईकल’चे श्रीहरिकोटा येथील ‘सतीश धवन लॉन्‍च सेंटर’ येथून १० फेब्रुवारीला सकाळी ९ वाजून १८ मिनिटांनी प्रक्षेपण केले.

तुर्कीये आणि सीरिया यांच्‍यानंतर पाकिस्‍तानात भूकंप येण्‍याच्‍या अफवेमुळे भीतीचे वातावरण

तुर्कीये आणि सीरिया यांच्‍यानंतर आता अफगाणिस्‍तान, पाकिस्‍तान आणि भारत यांचा क्रमांक आहे, असे भाकीत नॉर्वे येथील ‘सोलर सिस्‍टम ज्‍यॉमेट्री सर्व्‍हे’या संस्‍थेचे शास्‍त्रज्ञ फ्रँक होगरबीट्‍स यांनी केले आहे, असे वृत्त सामाजिक माध्‍यमांतून प्रसारित होत आहे.