आदित्य ठाकरे यांच्यावर गुन्हा नोंदवण्यासाठी राष्ट्रीय बाल अधिकार आयोगाकडून पोलीस आयुक्तांना नोटीस !

‘आरे वाचवा’ आंदोलनात लहान मुलांना सहभागी करून घेतल्याप्रकरणी राष्ट्रीय बाल अधिकार आयोगाने शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर गुन्हा नोंद करावा, यासाठी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना नोटीस पाठवली आहे.

नाशिक येथे रस्त्यात मद्यपी युवकांचा हिडीस पद्धतीने नाच !

येथील त्र्यंबकेश्वर भागात काही युवकांनी भर रस्त्यात ट्रकच्या हॉर्नच्या आवाजावर विक्षिप्त आणि हिडीस पद्धतीने नाच केला. युवकांनी मद्य प्राशन केले होते. एका तरुणाने तर थेट रस्त्यावरच ‘नागीण’ नृत्य केले. ‘रस्त्यात हुल्लडबाजी करणे हे निंदनीय आहे.

राष्ट्रपतीपदासाठी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची शिवसेनेच्या खासदारांची मागणी

शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी मात्र संयुक्त पुरोगामी आघाडीचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना पाठिंबा देण्याची मागणी केली.

ईदच्या दिवशी दुर्गाडी गडावर आरतीसाठी प्रवेश नाकारल्याने हिंदू आणि शिवसेना यांच्याकडून निषेध !

येथे ईदनिमित्त नमाजपठण होत असतांना आरती आणि घंटानाद करण्यासाठी हिंदूंना प्रवेशबंदी केली जाते. याचा निषेध म्हणून वर्ष १९८६ पासून येथे शिवसेनेच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात येते.

कोल्हापूर येथील ‘बी’ न्यूजच्या ‘संवाद-प्रतिवाद’ या कार्यक्रमात सनातन संस्थेचा सहभाग !

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने असणार्‍या ‘संवाद-प्रतिवाद’ या विशेष कार्यक्रमात सनातन संस्थेचे साधक श्री. अमोल कुलकर्णी, सौ. मेघमाला जोशी यांच्यासह आध्यात्मिक तज्ञ (क्वांटम) नम्रता देशमुख यांचा सहभाग आहे.

डासांसाठी वापरल्या जाणार्‍या ‘कॉईल’मुळे कर्करोगाची शक्यता !

डासांचा त्रास होऊ नये, यासाठी ‘मॉस्क्यूटो रिपेलेंट कॉईल’, डास पळवण्यासाठीची उदबत्ती, ‘इलेक्ट्रिक रिफिल’ यंत्र आदींचा वापर केला जातो. या सर्वांचा धूर फुफ्फुसांना हानी पोचवू शकतो. यामुळे कर्करोग होऊ शकतो !

(निवृत्त) एअर मार्शल सतीश इनामदार यांची सनातनच्या देवद (पनवेल) येथील आश्रमास भेट !

सनातन संस्थेचा आश्रम, साधकांची सेवा करण्याची तळमळ, आश्रमातील शिस्त हे सर्व पाहून ते भारावून गेले. त्यांनी स्वत:चा अमूल्य वेळ देऊन सर्व माहिती अत्यंत जिज्ञासेने जाणून घेतली. या वेळी पू. शिवाजी वटकर यांनी इनामदार यांना हिंदु धर्मासंबंधी ग्रंथ भेट दिले.

भुवैकुंठ प्रकल्प आणि श्री श्री राधा पंढरीनाथ मंदिराचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन !

पंढरपूर देवस्थान मंदिर परिसरातील भूवैकुंठ प्रकल्प आणि श्री श्री राधा पंढरीनाथ मंदिराचे भूमीपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

(म्हणे) ‘सरकारी कार्यालयात घातलेली सत्यनारायणाची पूजा ही घटनेची पायमल्ली !’

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयातील मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात घातलेली सत्यनारायणाची पूजा म्हणजे भारतीय राज्यघटनेतील धर्मनिरपेक्षतेच्या मूलभूत तत्त्वाची पायमल्ली आहे, अशी दर्पाेक्ती पुणे येथील मानवी हक्क कार्यकर्ते अधिवक्ता विकास शिंदे यांनी केली.

महावितरणच्या बनावट कर्मचार्‍याने महिलेला लुटले !

५३ वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार नोंद केली आहे.