नाशिक येथे रस्त्यात मद्यपी युवकांचा हिडीस पद्धतीने नाच !

ट्रकच्या हॉर्नच्या आवाजावर विक्षिप्त आणि हिडीस पद्धतीने नाच करतांना युवक 

नाशिक – येथील त्र्यंबकेश्वर भागात काही युवकांनी भर रस्त्यात ट्रकच्या हॉर्नच्या आवाजावर विक्षिप्त आणि हिडीस पद्धतीने नाच केला. युवकांनी मद्य प्राशन केले होते. एका तरुणाने तर थेट रस्त्यावरच ‘नागीण’ नृत्य केले. ‘रस्त्यात हुल्लडबाजी करणे हे निंदनीय आहे. यावर तात्काळ प्रशासनाने कारवाई करावी’, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

संपादकीय भूमिका

असे युवक राष्ट्राचे भवितव्य कसे घडवणार ?