महावितरणच्या बनावट कर्मचार्‍याने महिलेला लुटले !

पुणे – काही ॲप डाऊनलोड केल्यानंतर इंटरनेटच्या साहाय्याने वीजदेयक भरण्यास सांगणार्‍या महावितरणच्या बनावट (तोतया) कर्मचार्‍याने महिलेची १० लाख रुपयांची फसवणूक केली. ५३ वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार नोंद केली आहे.