मृत व्यक्तीची बनावट कागदपत्रे सिद्ध केल्याप्रकरणी भाजप आमदार जयकुमार गोरे यांची ५ घंटे चौकशी !

जयकुमार गोरे यांना सर्वाेच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी २ आठवड्यांची मुदत देण्यात आली होती. त्यांना सर्वाेच्च न्यायालयाने १ जुलैपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले आहे.

संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचा पवित्र नीरा नदीत स्नान सोहळा !

येथील नीरा नगरीत संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी २८ जून या दिवशी सकाळी ११ वाजता प्रवेश झाली. यानंतर ग्रामपंचायत कार्यालयासमोरील छत्रपती शिवाजी चौकात पालखी सोहळ्याचे स्वागत ग्रामस्थांनी केले.

कुर्ला येथील इमारत दुर्घटनेत १९ जणांचा मृत्यू !

या दुर्घटनेमध्ये मृत पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाइकांना राज्य सरकारकडून ५ लाख रुपयांचे साहाय्य घोषित करण्यात आले आहे.

राज्यातील अस्थिर परिस्थितीतही अध्यादेश काढून पैसे कमावण्याचे उद्योग ! – सुधीर मुनगंटीवार, नेते, भाजप

मुनगंटीवार म्हणाले की, राज्यपालांनी सरकारला विश्वासमत सिद्ध करण्यासाठी बोलावले पाहिजे, अशी मागणी होत आहे. या संदर्भात महाविकास आघाडीने आत्मचिंतन करावे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्यास मुख्यमंत्री अनुकूल !

२८ जून या दिवशी समितीतील एका गटाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यावर त्यांनी दि.बा. पाटील यांच्या नावाला हरकत नसल्याचे म्हटले, असे शिष्टमंडळातील पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

अमरावती येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहातून ३ बंदीवान पसार !

पोलिसांचा बंदोबस्त असतांना बंदीवान पसार होणे हे लज्जास्पद ! उत्तरदायी पोलीस कर्मचाऱ्यांना कामावरून काढून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करायला हवी.

आषाढी वारीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष ! – ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज, राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भाविक वारकरी मंडळ

आषाढी वारी ही महाराष्ट्राचा सांस्कृतिक ठेवा असून ऐतिहासिक वारसा जपणारी परंपरा आहे. यंदा २ वर्षांनंतर वारी होत असल्याने गर्दी पुष्कळ वाढली आहे.

‘सांगली अर्बन बँके’च्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘सत्ताधारी प्रगती पॅनल’ विजयी !

सत्तारूढ गटाचे नेतृत्व विद्यमान अध्यक्ष श्री. गणेशराव गाडगीळ हे करत होते, तर विरोधी पॅनेलचे नेतृत्व बापूसाहेब पुजारी आणि माजी अध्यक्ष प्रमोद पुजारी करत होते.

कराड (जिल्हा सातारा) येथे मोकाट कुत्र्यांच्या आक्रमणात मुलाचा मृत्यू !

मोकाट कुत्र्यांची समस्या प्रशासन किती आक्रमणे झाल्यावर सोडवणार ?

आणीबाणी म्हणजे लोकशाहीची हत्या !- दीपक शिंदे, भाजप

प्रत्येक वर्षी भाजपच्या वतीने २५ जून हा दिवस ‘आणीबाणी निषेधदिन’ म्हणून पाळला जातो. या निषेधदिनात आणीबाणीत कारागृहवास पत्करलेल्या कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.