पुणे महापालिकेकडे असलेल्या १ सहस्र ८७ सदनिका विनावापर !

सहस्रो सदनिका विनावापर पडून का आहेत ? एकीकडे आर्थिक दुर्बल घटकांना घरांची अडचण सोसावी लागणे आणि दुसरीकडे सदनिका विनावापर पडून असणे संतापजनक आहे !

नाशिक येथील पुरातत्व विभागाने संरक्षित केलेल्या नीलकंठेश्वर मंदिर परिसरातील पायर्‍या जेसीबीने तोडल्या !

पुरातत्व विभागाने संरक्षित केलेल्या नीलकंठेश्वर मंदिरातील पायर्‍या तोडण्यास अनुमती देणार्‍या ‘स्मार्ट सिटी’च्या अधिकार्‍यांवर कठोर कारवाई केली पाहिजे !

महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांतर विरोधी कडक कायदा होण्यासाठी २४ डिसेंबरला सांगलीत हिंदु जनआक्रोश मोर्चा ! – समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना

ज्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात कठोर कायदे होते, तशाच प्रकारच्या कठोर कायद्यांचीच आता आवश्यक आहे.

गुजरातमध्ये ‘रामराज्या’प्रमाणे आदर्श निर्माण करण्यासाठी भाजप सरकारला शुभेच्छा ! – हिंदु जनजागृती समिती

‘गुजरात ही देशातील हिंदुत्वाची प्रयोगशाळा आहे’, असे म्हटले जाते. आता यापुढे ‘रामराज्या’चे एक आदर्श उदाहरण म्हणूनही प्रचलित व्हावे, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या शुभेच्छा.

पुण्यातील हवेली तालुक्याच्या तहसीलदार तृप्ती कोलते निलंबित !

हडपसर येथील भूमी प्रकरणात तृप्ती कोलते यांनी दिलेले चुकीचे आदेश, कोरोनाच्या काळात औषध खरेदीतील अनियमितता आणि निवडणूक विषयक गंभीर स्वरूपाच्या तक्रारी यांच्यामुळे पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्याच्या तहसीलदार तृप्ती कोलते यांना निलंबित करण्याचे आदेश राज्यशासनाने दिले.

तुर्भे गावात खड्ड्यांचे साम्राज्य !

तुर्भे गावातील अंतर्गत आणि मुख्य रस्त्यांवर पुष्कळ प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे स्थानिक रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तुर्भे गावामध्ये तीन नगरसेवक, तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष यांचे वास्तव्य आहे.

सातारा जिल्ह्यातील ४९ ग्रामपंचायती बिनविरोध !

सातारा जिल्ह्यातील ३१९ ग्रामपंचायतींपैकी ४९ ग्रामपंचायतींमध्ये बिनविरोध निवडी पार पडल्या आहेत. २४२ गावांमध्ये सरपंचपदासाठी ६५५ उमेदवार रिंगणात आहेत. जिल्ह्यातील १ सहस्र ८१२ जागांसाठी ३ सहस्र ८९७ जणांनी सदस्यपदासाठी अर्ज प्रविष्ट केला आहे.

हिंगोली येथे गोतस्करांकडून पोलिसांवर दगडफेक !

आरोपींच्या वाहनावर समोरच्या बाजूने संभाजीनगर येथील वाहन क्रमांक, तर पाठीमागच्या बाजूने नांदेड येथील क्रमांक आहे. त्यामुळे ‘हे वाहन चोरीचे असावे’, असा पोलिसांना संशय आहे.

नागपूर येथे ११ डिसेंबरला समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण !

मुंबई-नागपूरला जोडणार्‍या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या नागपूर-शिर्डी या ५२० किमीच्या पहिल्या टप्प्याचे ११ डिसेंबर या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे.

व्हिसा संपलेल्या लाखो विदेशी नागरिकांचे भारतात अवैध वास्तव्य !

भारतात अवैधपणे रहाणार्‍या विदेशी नागरिकांवर केंद्र सरकारचे नियंत्रण कसे नाही ? त्यांची संख्या लाखोंच्या घरात जाईपर्यंत सरकारी यंत्रणा काय करत होत्या ?