
सांगली, १० डिसेंबर (वार्ता.) – ‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांतर यांमुळे हिंदु समाजाला कौटुंबिक, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक स्तरांवर मोठी हानी होत आहे. हिंदु युवती आणि महिला यांच्या मनात असुरक्षिततेची भावना आहे. त्यामुळे अन्य राज्यांप्रमाणे महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांतर विरोधी कडक कायदा होण्यासाठी २४ डिसेंबरला सांगलीत हिंदु जनआक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने १० डिसेंबर या दिवशी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.
या प्रसंगी माजी आमदार श्री. नितीन शिंदे, भाजपच्या नगरसेविका अधिवक्त्या (सौ.) स्वाती शिंदे, माजी महापौर आणि भाजपच्या नगरसेविका सौ. संगीता खोत, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सचिव श्री. पृथ्वीराज पवार, सौ. सविता मदने, भाजपच्या नगरसेविका सौ. उर्मिला बेलवलकर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. संतोष देसाई, बजरंग दलाचे मिरज तालुका संयोजक श्री. आकाश जाधव, श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे अध्यक्ष श्री. नितीन चौगुले यांच्यासह राष्ट्रसेविका समिती, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदु परिषद, हिंदु एकता आंदोलन यांचे प्रतिनिधी पत्रकार परिषदेसाठी उपस्थित होते.
या प्रसंगी श्री. नितीन शिंदे म्हणाले, ‘‘काही व्यायामशाळा, कला प्रशिक्षण देणार्या संस्था, नृत्यप्रशिक्षण देणार्या संस्था यांमधून हिंदु युवतींना फूस लावण्याचे काम चालू आहे. मी रहात असलेल्या प्रभाग क्रमांक १६ मध्येही माझ्याकडे ‘लव्ह जिहाद’च्या अनेक तक्रारी आल्या आहेत. तरी अशा प्रकारे हिंदु युवतींचे आयुष्य उद्ध्वस्त करणार्या ‘लव्ह जिहादीं’ना फाशीची शिक्षाच होणे आवश्यक आहे. श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे अध्यक्ष श्री. नितीन चौगुले म्हणाले, ‘‘लव्ह जिहाद हे आंतरराष्ट्रीय षड्यंत्र असून असे प्रकार करणार्यांना आर्थिक पुरवठा कोण करते ? याचे राष्ट्रीय अन्वेषणयंत्रणा, ‘ईडी’ यांच्याकडून अन्वेषण झाले पाहिजे.’’
या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे श्री. संतोष देसाई म्हणाले, ‘‘ज्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात कठोर कायदे होते, तशाच प्रकारच्या कठोर कायद्यांचीच आता आवश्यक आहे.’’
टाकळी (सांगली) येथे वाढीव वर्गणी देऊनही भेडसावणार्या तीव्र पाणीटंचाईमुळे नागरिक त्रस्त !
कुडाळ येथील शासकीय भूमीतील अनधिकृत ‘फास्ट फूड स्टॉल’ अखेर हटवला
पुणे शहरातील रस्त्यांवर केवळ ५४ खड्डेच !
उसप गावातील प्रस्तावित दगड खाण आणि क्रशर प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध
पत्नीचा छळ करून तिची आक्षेपार्ह छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी
मोरजी येथे घर पाडण्याच्या कारवाईच्या वेळी रहिवाशाचा आत्महत्येचा प्रयत्न