वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवात पार पडले ‘द रॅशनलिस्‍ट मर्डर्स’ (पुरोगाम्‍यांच्‍या हत्‍या) मागील सत्‍य आणि ‘हिंदुहितासाठी न्‍यायालयीन सुधारणा’ यांचे सत्र !

सनातन संस्‍था लोकांना संघटित करते. त्‍यामुळे तिला नास्‍तिकतावाद्यांच्‍या हत्‍या प्रकरणांमध्‍ये लक्ष्य करण्‍यात आले. या प्रकरणांमध्‍ये खरे मारेकरी शोधण्‍याचा प्रयत्न न करता अन्‍वेषण करण्‍यात आले. या सर्व प्रकरणांमध्‍ये कुठेही ठोस पुरावे मिळाले नसून केवळ राजकीय लाभ घेण्‍यासाठी प्रयत्न झाला आहे.

हिंदु राष्ट्राची स्थापनेसाठी हिंदूंना संघर्ष करावा लागेल ! – जुगल किशोर तिवारी, संरक्षक, अखिल भारतीय ब्राह्मण एकता परिषद, उत्तरप्रदेश

संघर्ष आणि आव्हाने ही कधी आपल्या मार्गात बाधा असत नाहीत, तर ती नवीन संधी निर्माण करतात. भगवान श्रीकृष्ण, प्रभु श्रीराम यांनाही संघर्ष करावा लागला.

हिंदु जनसंघर्ष मोर्चाचे जनआंदोलन हिंदु राष्ट्राची स्थापना होईपर्यंत चालू ठेवूया ! – कु. प्रियांका लोणे, समन्वयक, हिंदु जनजागृती समिती, संभाजीनगर

या मोर्च्यांमुळे हिंदूंमधील आत्मविश्वास वाढून हिंदुत्वावरील आघातांच्या विरोधात एकत्रित लढण्याची मानसिकता निर्माण झाली आणि याची झलक श्रीरामनवमीच्या दिवशी झालेल्या दंगलीनंतर पहायला मिळाली.

राष्ट्रनिर्माणासाठी त्याग आणि राष्ट्र अन् धर्म यांप्रती निष्ठा आवश्यक ! – अभय वर्तक, धर्मप्रचारक, सनातन संस्था

हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी आध्यात्मिक बळ लागेल आणि ते साधनेद्वारेच प्राप्त होईल. समष्टी साधना करण्यासाठी आवश्यक बळ व्यष्टी साधनेने प्राप्त होईल आणि आध्यात्मिक स्तरावर केलेल्या राष्ट्रसेवेतून ईश्वरप्राप्ती करता येईल.

‘समलैंगिकता’ आणि ‘लिव्ह -इन-रिलेशनशीप’ यांद्वारे हिंदु धर्माला कमकुवत करण्याचे षड्यंत्र ! – पू. (डॉ.) शिवनारायण सेन, उपसचिव, शास्त्र-धर्म प्रचार सभा, बंगाल

‘समलैंगिकता’ आणि ‘लिव्ह-इन-रिलेशनशीप’ ही पाश्चात्त्य संस्कृती आहे. यामुळे भारतातील कुटुंबव्यवस्था नष्ट होत आहे. कलियुगाच्या प्रभावामुळे हे प्रकार वाढत आहेत. कलिच्या प्रभावामुळे ‘ईष्ट’ हे ‘अनिष्ट वाटते आणि ‘अनिष्ट’ ते ‘ईष्ट’ वाटते.

छत्तीसगडमधील काँग्रेस शासन हिंदुविरोधी ! – पं. नीलकंठ त्रिपाठी महाराज, संस्थापक, श्री नीलकंठ सेवा संस्थान, रायपूर, छत्तीसगड

राज्यात हिंदु देवतांची विटंबना झाल्यावर ती करणार्‍यावर कारवाई न करता प्रशासनाकडून सर्वप्रथम त्याविषयी संताप व्यक्त करणारे धार्मिक संत आणि हिंदुत्वनिष्ठ नेते यांच्यावर कारवाई करण्यात येते.

न्यायव्यवस्थेमध्ये कर्मफलन्याय सिद्धांताचा समावेश अत्यावश्यक ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

एकाच प्रकारचा गुन्हा असूनही गुन्हेगारांना वेगवेगळी शिक्षा कशी होते ? यामागे कर्मफलसिद्धांत आहे का ? जेव्हा एखाद्याकडून बलात्कारासारखा गुन्हा होतो, तेव्हा त्यामागे ‘काम’ आणि ‘क्रोध’ या षड्रिपूंमधील दोषांचा समावेश असतो.

कठुआ बलात्कार प्रकरण म्हणजे हिंदूंना जम्मूतून हाकलून देण्यासाठीचे षड्यंत्र !- प्रा. मधु किश्‍वर, संपादक, ‘मानुषी’, देहली

कथित बलात्कार प्रकरणाला ‘कठुआ बलात्कार’ प्रकरण म्हणून जगभर कुप्रसिद्धी देण्यात आली. देशभरातील सेक्युलरवाद्यांनी, बॉलीवूडच्या अभिनेत्यांनी आणि हिंदुविरोधकांनी या प्रकरणाचा वापर जगभरात हिंदूंना अपकीर्त करण्यासाठी केला.

पुढील ५ वर्षांत अरुणाचल प्रदेशमधील ख्रिस्ती धर्मांतराची समस्या संपवू ! – श्री. कुरु ताई, उपाध्यक्ष, बांबू संसाधन आणि विकास एजन्सी, अरुणाचल प्रदेश

कर्करोगाच्या रुग्णांना बरे करण्याचे आव्हान ख्रिस्ती पाद्य्रांना दिले तेव्हा त्यांनी नकार दिला. अशा प्रकारे हिंदूंच्या धर्मांतराचा प्रयत्न करणार्‍या तेथील ख्रिस्त्यांचे षड्यंत्र आम्ही उघड करत आहोत-श्री. कुरु ताई

चेन्नई येथील शिवाचारयार ट्रस्टचे विश्‍वस्त श्री. टी. एस्. साम्बमूर्ती कलिदोस यांचा सन्मान !

वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या चौथ्या दिवशी म्हणजे १९ जून या दिवशी चेन्नई येथील शिवाचारयार ट्रस्टचे विश्‍वस्त श्री. टी. एस्. साम्बमूर्ती कलिदोस यांचा सत्कार करतांना चेन्नई येथील सनातनचे साधक श्री. बाळाजी कोल्ला.