‘समलैंगिकता’ आणि ‘लिव्ह -इन-रिलेशनशीप’ यांद्वारे हिंदु धर्माला कमकुवत करण्याचे षड्यंत्र ! – पू. (डॉ.) शिवनारायण सेन, उपसचिव, शास्त्र-धर्म प्रचार सभा, बंगाल

पू. (डॉ.) शिवनारायण सेन

रामनाथ देवस्थान – जेथे ‘राम’ आहे, तेथे ‘काम’ चालत नाही आणि जेथे ‘काम’ आहे, तेथे ‘राम’ नसतो. पाश्चात्त्यांमध्ये मोक्षाची संकल्पना कुठे नाही. काम म्हणजे माया आहे आणि माया जीवाला पुष्कळ दुःख देते. ‘समलैंगिकता’ आणि ‘लिव्ह-इन-रिलेशनशीप’ ही पाश्चात्त्य संस्कृती आहे. यामुळे भारतातील कुटुंबव्यवस्था नष्ट होत आहे. कलियुगाच्या प्रभावामुळे हे प्रकार वाढत आहेत. कलिच्या प्रभावामुळे ‘ईष्ट’ हे ‘अनिष्ट वाटते आणि ‘अनिष्ट’ ते ‘ईष्ट’ वाटते. ‘समलैंगिकता’ आणि ‘लिव्ह-इन-रिलेशनशीप’ याविषयीही हेच चालू आहे. आगीत तूप टाकले, तर जशी आग अधिक भडकते, त्याप्रमाणे भोगांची तृप्ती न होता ते अधिक वाढतात. आपली संस्कृती भोगवादी नव्हे, तर निवृत्तीपोषक आहे. भारतीय वर्णव्यवस्थाही निवृत्तीपोषक आहे. अल्लाउद्दीन खिलजी याच्या हाती पडू नये, यासाठी राणी पद्मिनीसह १६ सहस्र महिलांनी अग्नीप्रवेश केला, अशी भारताची महान संस्कृती आहे. ‘समलैंगिकता’ आणि ‘लिव्ह- इन-रिलेशनशीप’ हिंदु धर्माला कमकुवत करण्याचे षड्यंत्र आहे, असे उद्गार बंगाल येथील ‘शास्त्र-धर्म प्रचार सभे’चे उपसचिव पू. (डॉ.) शिवनारायण सेन यांनी काढले. ते वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या चतुर्थ दिनी (१९.६.२०२३ या दिवशी) उपस्थितांना संबोधित करत होते.