छत्तीसगडमधील काँग्रेस शासन हिंदुविरोधी ! – पं. नीलकंठ त्रिपाठी महाराज, संस्थापक, श्री नीलकंठ सेवा संस्थान, रायपूर, छत्तीसगड

पं. नीलकंठ त्रिपाठी महाराज

रामनाथ देवस्थान – २५ आणि २६ डिसेंबर २०२१ या दिवशी रायपूर येथे धर्मसंसदेचे आयोजन करण्यात आले होते. त्या धर्मसंसदेमध्ये गांधीजींविषयी कथित वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी कालीचरण महाराज यांना छत्तीसगड पोलिसांनी अटक केली आणि त्यांच्या विरोधात राष्ट्रद्रोहाचा गुन्हा नोंदवला. या विरोधात साधू-संत आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन केले. प्रभु श्रीराम यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे वडील नंदकुमार बघेल यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती; पण गांधीजींवर कथित टीका केल्याप्रकरणी कालीचरण महाराज यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. यावरून छत्तीसगड सरकारला प्रभु श्रीरामांपेक्षा गांधीजी अधिक महत्त्वाचे वाटतात. राज्यात हिंदु देवतांची विटंबना झाल्यावर ती करणार्‍यावर कारवाई न करता प्रशासनाकडून सर्वप्रथम त्याविषयी संताप व्यक्त करणारे धार्मिक संत आणि हिंदुत्वनिष्ठ नेते यांच्यावर कारवाई करण्यात येते. नंदकुमार बघेल यांनी ब्राह्मणांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केले होते. तेव्हा हिंदुत्वनिष्ठांनी राज्यस्तरीय तीव्र आंदोलन केले होते. तेव्हा दबावापोटी नंदकुमार बघेल यांना ३ दिवसांसाठी अटकेत ठेवण्यात आले होते, अशा शब्दांत रायपूर (छत्तीसगड) येथील ‘श्री नीलकंठ सेवा संस्थान’चे संस्थापक पं. नीलकंठ त्रिपाठी महाराज यांनी संताप व्यक्त केला. ते वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या चतुर्थ दिनी (१९.६.२०२३ या दिवशी) उपस्थितांना संबोधित करत होते.