युसूफला ‘काका’ मानले आणि त्याने माझा विश्वासघात केला ! – पीडित युवती, गोवा

संशयित युसूफ तिच्या शेजारीच रहात होता. त्याच्याकडे ती वडिलांप्रमाणे पहात होती आणि म्हणूनच त्याला ती ‘अंकल’ (काका) अशी हाक मारायची; मात्र हा ‘काका’च एक दिवस आपला काळ ठरेल असे पीडित युवतीने स्वप्नातही पाहिले नव्हते.

गोव्यातील पारंपरिक गणेशमूर्तीकारांमध्ये व्यवसाय बंद पडण्याची भीती !

मूर्तीकारांच्या मते त्यांना आवश्यक अशी चिकण माती मिळत नाही. मूर्ती बनवण्यासाठी पुरेशा प्रमाणात कारागीर मिळत नाहीत. नवीन पिढी या व्यवसायात उतरू पहात नाही. केवळ पारंपरिक व्यवसाय म्हणून हा व्यवसाय जिवंत ठेवला आहे.

गोव्यातील जंगलांत ५ वाघांचा अधिवास

विशेष म्हणजे गोव्यातील म्हादई अभयारण्याला ‘व्याघ्र प्रकल्प’ म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव राज्य वन्य जीव मंडळाने फेटाळणे आणि उच्च न्यायालयाने ३ मासांच्या आत व्याघ्र प्रकल्प घोषित करण्याविषयी आदेश देणे या वादाच्या पार्श्वभूमीवर वर्ष २०२२च्या व्याघ्रगणनेचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे !

गोवा : न्यायालयात कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यापेक्षा व्याघ्रक्षेत्र घोषित करा !

लोकभावनेचा विचार करून उच्च न्यायालयाने सरकारला ३ मासांत म्हादई अभयारण्य व्याघ्र क्षेत्र घोषित करण्याचा आदेश दिला आहे. या आदेशाची मुख्यमंत्र्यांनी तातडीने कार्यवाही करावी.

गोवा : लैंगिक अत्याचार करणार्‍या युसुफला महाविद्यालयीन युवतीने तोंडावर ‘स्प्रे’ आणि मिरची पूड मारून दिला यथेच्छ चोप !

अन्य युवती आणि महिला यांनी यातून बोध घेऊन स्वतःचे रक्षण करण्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्यावे !

गोवा : अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ करणारी टोळी गजाआड

शयितांमधील प्रणीत लोलयेकर व्यतिरिक्त अन्य परप्रांतीय आहेत. पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार साहित्य (‘सी.एस्.ए.एम्.’ – Child Sexual Abuse Material) कायद्याचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणी ही कारवाई केली.

बहुसंख्यांकांच्या भावना दुखावतील असे विधान करू नये ! – पुरातत्व विभागाचे मंत्री सुभाष फळदेसाई, गोवा

असे पुरातत्व खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी ‘आप’चे आमदार क्रूझ सिल्वा यांना सुनावले. ‘छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती का साजरी करावी ?’, असा प्रश्‍न ‘आप’चे आमदार क्रूझ सिल्वा यांनी विचारला होता.

म्हादई अभयारण्य आणि मोले राष्ट्रीय उद्यान येथे ५ वर्षांत ३८ वेळा वाघांचे दर्शन

व्याघ्र प्रकल्पावरून राज्यात गदारोळ माजलेला असतांनाच गेल्या ५ वर्षांत म्हादई अभयारण्य आणि मोले राष्ट्रीय उद्यान येथे वन खात्याने लावलेल्या कॅमेर्‍यांमध्ये ३८ वेळा वाघांचे दर्शन झाल्याची माहिती समोर आली आहे.

गोवा : लोकप्रतिनिधींच्या विरोधात साडेपाच वर्षांत १३५ गुन्हे नोंद

गेल्या साडेपाच वर्षांत आजी-माजी आमदार, नगराध्यक्ष, नगरसेवक, सरपंच, पंचसदस्य आणि इतर लोकप्रतिनिधी यांच्या विरोधात हे गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत. यामधील ५९ प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत, तर १६ प्रकरणांचे पोलीस अन्वेषण करत आहेत.

गोवा : कोलवाळ कारागृह प्रशासनाची कारागृहात अचानक तपासणी

कारागृह रक्षक आणि बंदीवान यांचे संगनमत असल्याविना भ्रमणभाष संच आणि इतर पदार्थ कारागृहात बंदीवानांपर्यंत कसे पोचतील ? अशा कारागृह रक्षकांना शोधून त्यांना कारागृहात टाका !