ओजरांत, हणजूण येथील वादग्रस्त ‘सनबर्न बीच क्लब’ला अखेर शासनाकडून टाळे

उत्तर गोवा प्रशासनाने अखेर ओजरांत, हणजूण येथील वादग्रस्त ‘सनबर्न बीच क्लब’ला टाळे ठोकले आहे. ‘गोवा समुद्रकिनारपट्टी विभाग व्यवस्थापन प्राधिकरणा’ने या क्लबचे बांधकाम अनधिकृत असल्याचे सांगून ही कारवाई केली.

वझरीवासियांचा मुक्तीसाठी लढा : मुख्यमंत्र्यांना निवेदन सुपुर्द

गोवामुक्तीचा हिरक महोत्सव साजरा होत आहे. पेडणे तालुक्यातील वझरी गाव मात्र अद्यापही मुक्त झालेला नाही. वझरी गावावर पोर्तुगीज काळापासून ‘कोर्ट रिसिव्हर’ नामक सालाझाराची सत्ता आहे.

मये येथील स्थलांतरित मालमत्तेच्या प्रश्‍नाविषयी ‘मये-भूविमोचन नागरिक समिती’ राष्ट्रपतींना निवेदन देणार

गोवा मुक्त होऊन ६० वर्षे उलटूनही ‘स्थलांतरित मालमत्ते’चा प्रश्‍न न सुटल्याने मयेवासीय भूमीच्या मालकी अधिकारापासून वंचित, रहाणे दुर्दैवी !

राज्यात १ सहस्रहून अधिक वारसा स्मारके; मात्र वारंवार मागणी करूनही ही स्मारके अधिसूचित न केल्याने इतिहासप्रेमींमध्ये अप्रसन्नता !

‘‘गोवा केवळ समुद्रकिनारे, कॅसिनो आणि मद्य यांसाठीच प्रसिद्ध असल्याचा गैरसमज पर्यटकांमध्ये आहे. राज्यातील वारसा स्मारक आणि स्थळे अधिसूचित करून ती पर्यटकांसाठी खुली करावी.’’

गोवा मुक्तीच्या षष्ठ्यब्दीनिमित्त आज सोहळा

गोवा मुक्तीदिनाच्या निमित्ताने परंपरागत ध्वजारोहण कार्यक्रम सकाळी कांपाल मैदानात होणार आहे. या वेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल.

गैरप्रकारांना अनुसरून ‘बी.एल्.ओ.’मध्ये पालट करण्याचा मुख्य निवडणूक अधिकार्‍यांचा आदेश

गैरप्रकार झाल्यावरून ‘बूथ लेव्हल ऑफिसर’मध्ये (बी.एल्.ओ.) पालट करण्याचा आदेश मुख्य निवडणूक अधिकार्‍यांनी दक्षिण गोवा जिल्हा निवडणूक अधिकार्‍यांना दिला आहे.

राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी गोवा सज्ज

राष्ट्रपती रामनाथ कोविंद मुक्तीदिनाच्या निमित्ताने गोमंतकियांना संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमासाठी मर्यादित मान्यवरांनाच निमंत्रित करण्यात आल्याने या कार्यकमाचे संपूर्ण गोमंतकियांसाठी सर्व वृत्तवाहिन्यांवर थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

जिल्हा पंचायतीचा पराभव एक आव्हान म्हणून स्वीकारणार ! – दिगंबर कामत, विरोधी पक्षनेते

जिल्हा पंचायतीत पक्षाचा झालेला पराभव आम्ही एक आव्हान म्हणून स्वीकारत आहोत. गोमंतकियांच्या जिव्हाळ्याचे प्रश्‍न हाताळून आम्ही यापुढे गोमंतकियांना एक चांगले नेतृत्व देणार आहोत.

भारतीय तटरक्षक दलाच्या ‘सुजित’ गस्ती जहाजाचे लोकार्पण

या ‘ऑफ शोर’ गस्ती जहाजाचे ‘डिझाईन’, तसेच जहाजाची बांधणी ‘गोवा शिपयार्ड’ने केली आहे. जहाजात तंत्रज्ञान, ‘नेव्हीगेशन’, दळणवळण यंत्रणा, ‘सेन्सर’ आदी आधुनिक साधनसुविधा बसवण्यात आल्या आहेत.

६० व्या गोवा मुक्तीदिन सोहळ्यावर बहिष्कार घालूच शकत नाही ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

जवाहरलाल नेहरूंमुळे गोव्याला स्वातंत्र्य विलंबाने मिळाल्याच्या सूत्राविषयीची माहिती वर्षभराच्या कार्यक्रमांमधून मिळेल