अतिक्रमण हटवा आणि भूमीचे उत्खनन करून ऐतिहासिक वारसा जनतेसमोर आणा ! – हिंदू रक्षा महाआघाडी, गोवा

हिंदूंना अशी मागणी का करावी लागते ? पुरातत्व खाते स्वतःहून सत्य जनतेसमोर का आणत नाही ?

पेडणे तालुक्यातील टॅक्सी व्यावसायिकांचे त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आंदोलन

देहली दौर्‍यावर असलेले मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत याविषयी प्रसारमाध्यमांना म्हणाले, ‘‘टॅक्सी व्यावसायिक अकारण आंदोलन करत आहेत. वास्तविक टॅक्सी व्यावसायिकांसाठी मोपा विमानतळावरील शुल्क २०० रुपयांवरून ८० रुपये केले आहे.’’

मोरजी येथील ‘रिसॉर्ट’मध्ये दहीहंडी कार्यक्रमात बियर प्राशनाला प्रोत्साहन देणारे विज्ञापन प्रसारित

याविषयी हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी २१ ऑगस्ट या दिवशी मांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट (दाखल) केल्यावर ‘रिसॉर्ट’च्या व्यवस्थापनाने संबंधित वादग्रस्त पोस्ट हटवली आहे.

डॉक्टरांच्या सुरक्षेला प्राधान्य असून समन्वयासाठी महिला डॉक्टर नियुक्त करणार ! – आरोग्यमंत्री विश्वजीत राणे

‘गोवा रेसिडेंट डॉक्टर असोसिएशन’च्या (‘गार्ड’च्या) शिष्टमंडळाने मंत्री विश्वजीत राणे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.

हणजूण-वागातोर येथील ५ नाईट क्लबांच्या विरोधात गुन्हे नोंद

ध्वनीप्रदूषणाच्या विरोधात एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रथमच कारवाई झालेली आहे. ध्वनीप्रदूषणाच्या विरोधात स्थानिकांनी सतत ४ दिवस काढलेल्या मेणबत्ती मोर्चाची ही फलनिष्पत्ती असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.

गोवा सरकारच्या विविध खात्यांमध्ये आर्थिक गैरव्यवहाराची २९ प्रकरणे; मात्र दोषींवर कारवाई नाही ! – महालेखापाल

चालू वर्षी जानेवारी मासापर्यंत एकूण २९ प्रकरणांमध्ये सरकारी खात्यांमध्ये १ कोटी ८० लाख रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाला आहे. यामधील १६ प्रकरणांमध्ये १ कोटी २० लाख रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झालेला आहे आणि ही सर्व प्रकरणे सुमारे १० वर्षे जुनी आहेत.

२१ टक्के सरकारी प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या १० हून अल्प

सरकार सरकारी प्राथमिक शाळांच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करत आहे, तसेच सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून शाळांमध्ये विद्यार्थ्यांना विनामूल्य वह्या, पाठ्यपुस्तके, गणवेश आणि ‘रेनकोट’ वितरित केले जात आहेत.   

गोव्यातील सरकारी आणि खासगी रुग्णालयांतील डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी कायदा करू ! – आरोग्यमंत्री विश्वजीत राणे

सरकारी आणि खासगी रुग्णालयांतील डॉक्टर, परिचारिका आणि अन्य कर्मचारी यांच्या सुरक्षेसाठी लवकरच एकतर वटहुकूम आणू किंवा पुढील विधानसभा अधिवेशनात कायदा आणू, अशी हमी गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली.

गोव्यातील डॉक्टरांकडून गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या बाहेर निदर्शने

कोलकाता येथील रुग्णालयात ९ ऑगस्ट या दिवशी एका ३१ वर्षीय महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्याची घटना घडली.

पोलीस उपनिरीक्षकाने भूमी बळकावणे प्रकरणातील आरोपीला पोलीस निरीक्षकाच्या दूरभाषवरील संभाषणाची माहिती पुरवली

पोलीस निरीक्षकाने केलेल्या दूरभाषविषयीचा कॉल डिटेल रेकॉर्ड (दूरभाषवरील संभाषणाविषयीची नोंद) लबाडीने मिळवल्याच्या प्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाने पोलीस उपनिरीक्षक आदित्य वेळीप याच्या विरोधात प्रथमदर्शनी अहवाल नोंदवला आहे.