पोलीस उपनिरीक्षकाने भूमी बळकावणे प्रकरणातील आरोपीला पोलीस निरीक्षकाच्या दूरभाषवरील संभाषणाची माहिती पुरवली

पोलीस निरीक्षकाने केलेल्या दूरभाषविषयीचा कॉल डिटेल रेकॉर्ड (दूरभाषवरील संभाषणाविषयीची नोंद) लबाडीने मिळवल्याच्या प्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाने पोलीस उपनिरीक्षक आदित्य वेळीप याच्या विरोधात प्रथमदर्शनी अहवाल नोंदवला आहे.

ध्वनीप्रदूषणावरून वागातोर येथील ‘थलासा बाय क्लिफ’ या उपाहारगृहाच्या विरोधात गुन्हा नोंद

ध्वनीप्रदूषणासंबंधी नियम न पाळल्याविषयी वागातोर येथील ‘थलासा बाय क्लिफ’ या उपाहारगृहाचे मालक सिलरॉय मास्केल यांच्या विरोधात हणजूण पोलीस ठाण्यामध्ये ध्वनीप्रदूषण नियमन आणि नियंत्रण नियम २००० अन् पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ चे कलम १५ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

हणजूण आणि वागातोर परिसरात ३२ ट्रान्स पार्ट्यांचे आयोजन : कानाकोपर्‍यात पार्ट्यांचे फलक

हणजूण आणि वागातोर परिसरात १४ ते १८ ऑगस्ट या कालावधीत एकूण ३२ ट्रान्स पार्ट्यांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सामाजिक माध्यमात करण्यात येत असलेल्या विज्ञापनाद्वारे मिळाली आहे.

मोरजी येथील नाईट पार्ट्यांचे फलक आगरवाडा-चोपडे पंचायतीच्या सरपंचांनी हटवले

स्वैराचाराचे प्रदर्शन घडवणार्‍या नाईट पार्ट्यांचे फलक स्वेच्छा नोंद घेऊन हटवणारे आगरवाडा-चोपडे पंचायतीचे सरपंच सचिन राऊत यांचे अभिनंदन !

गोव्याबाहेरील प्रसारमाध्यमांकडून गोव्यात भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा होत नसल्याचे चुकीचे वृत्त प्रसारित

गोवा पोर्तुगिजांच्या जोखडातून १९ डिसेंबर १९६१ या दिवशी मुक्त झाला. यानंतर १५ ऑगस्ट १९६२ पासून प्रतिवर्ष गोव्यात भारतीय स्वातंत्र्यदिन साजरा केला जातो, तरीही गोव्याबाहेरील काही प्रसारमाध्यमांनी ‘गोव्यात भारतीय स्वातंत्र्यदिन साजरा होत नाही’

वर्षभरात सरकारी खात्यातील २ सहस्र ५०० रिक्त पदे भरणार ! – मुख्यमंत्री सावंत

राज्य कर्मचारी भरती आयोगाच्या वतीने येत्या वर्षभरात सरकारी खात्यांमधील २ सहस्र ५०० रिक्त पदे भरली जाणार आहेत. त्याचप्रमाणे खाजन भूमीच्या संरक्षणासाठी ‘खाजन विकास आणि संवर्धन मंडळ’ स्थापन करण्यात येईल..

‘नाईट पार्ट्यां’च्या ध्वनीप्रदूषणाला आळा घाला, अन्यथा उच्च न्यायालयाच्या दारात बसून आंदोलन करू !

नागरिकांवर अशी पाळी आणणारे पोलीस आणि प्रशासन काय कामाचे ?

गोव्यात बनावट आधारकार्डधारक विदेशी नागरिकांचा वावर

गोव्यात बनावट आधारकार्डधारक विदेशी नागरिकांचा वावर चालू आहे. पोलीस आणि प्रशासन यांनी हल्लीच भाडेकरू तपासणी मोहीम हाती घेतली असता ही गोष्ट उघडकीस आली आहे.

कोलवा येथे कायद्याचे उल्लंघन करून बांधलेला बंगला पाडला

हे बांधकाम देहलीतील व्यावसायिक पवनकुमार अरोरा यांनी केले होते. या वेळी सासष्टीचे मामलेदार प्रतापराव गावकर उपस्थित होते.