
मुंबई – गोवंडी येथील अनधिकृत भोंग्यांच्या प्रकरणी पोलिसांत केलेल्या तक्रारीवरून भाजपचे नेते आणि माजी खासदार डॉ. किरीट सोमय्या यांना देण्यात आलेल्या धमकीच्या प्रकरणी भाजपच्या शिष्टमंडळाने ७ एप्रिल या दिवशी मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्याकडे तक्रार केली आहे. आमदार मिहीर कोटेचा, आमदार कॅ. आर्. तामिळ सेल्वन, माजी आमदार सुनील राणे आदी या वेळी उपस्थित होते.