धर्मांधाचे चाकूने आक्रमण
ठाणे – शेवई खाण्यास न दिल्याचा राग आल्याने इक्रार उपाख्य कल्लन या सराईत गुन्हेगाराने घर मालकावर चाकून वार करून आक्रमण केले. या प्रकरणी आरोपी इक्रार उपाख्य कल्लन याला अटक करण्यात आली आहे. (कायद्याचे भय नसल्यामुळेच धर्मांध असे गुन्हे करण्याचे धाडस करत आहेत ! – संपादक)
महिलेची हत्या; धर्मांधाला अटक !
ठाणे – आंबिवली येथे रंजना पाटेकर (वय ६० वर्षे) यांची गळा दाबून हत्या केल्याप्रकरणी एका संशयिताला खडकपाडा पोलिसांनी अटक केली होती; पण पोलिसांनी आता खरा आरोपी चांद उपाख्य अकबर महंमद शेख याला अटक केली आहे. पाटेकर यांची हत्या करून त्यांच्या अंगावरील १ लाख ५ सहस्र रुपये किमतीचे दागिने लुटून तो पसार झाला होता.
तरुणीवर अत्याचार करणारा आरोपी अटकेत !
ठाणे – फेसबुकवरील ओळखीचे प्रेमात रूपांतर झाल्यावर त्यातूनच तरुणीवर अत्याचार करण्यात आले. त्याची चित्रफीत सिद्ध करून ती सामाजिक माध्यमांवर प्रसारित केल्यावर तरुणीने पोलिसात तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी पंकज राममनोहर शुक्ला (वय २५ वर्षे) याला अटक केली आहे. (अशा आरोपींना कठोर शिक्षा झाल्यास असे प्रकार करण्याचे धाडस कुणी करणार नाही ! – संपादक)