व्यष्टी साधनेचे गांभीर्य आणि सेवाभाव असलेले रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील श्री. शिवप्रसाद कब्बुरे !

श्री. शिवप्रसाद कब्बुरे

 १. नम्रपणा 

‘श्री. शिवप्रसाद यांचे बोलणे आणि कृती करणे यांतून त्यांची नम्रता जाणवते. ते कठीण प्रसंगातही स्थिर आणि शांत राहून बोलत असतात.

२. व्यष्टी साधनेचे गांभीर्य  

शिवप्रसाद यांना त्यांची चूक सांगितल्यावर ते स्वतःची चूक कुठलेही स्पष्टीकरण न देता त्वरित स्वीकारतात. ते नियमितपणे स्वयंसूचना देतात. काही कालावधीनंतर ते स्वयंसूचनेत पालट करतात, तसेच ते केलेली स्वयंसूचना संबंधित साधकांकडून पडताळूनही घेतात.

श्री. सुदिश पुथलत

३. सेवाभाव  

अ. शिवप्रसाद यांना सांगितलेली सेवा ते लगेच स्वीकारतात. ते स्वतःचा विचार न करता सांगितलेली सेवा उत्साहाने करतात. त्यांच्यात अहं अल्प असल्याचे जाणवते.

आ. एकदा मी एका साधकाला अन्य एका वृद्ध साधकांचे कपडे इस्त्री करण्याविषयी विचारत होतो. त्या साधकाने ‘सेवा करू शकत नाही’, असे मला सांगितले. हे बाजूला उभे असलेल्या शिवप्रसाद यांनी ऐकल्यावर ते स्वतःहून कपड्यांना इस्त्री करण्याची सेवा करण्यास सिद्ध झाले.

इ. एकदा एका संतांना चहा नेऊन देण्याची सेवा होती. त्यासाठी मी साधक शोधत होतो. त्या वेळी शिवप्रसादला फुले तोडून आणायची सेवा करायची होती, तरीही त्यांनी संतांना चहा नेऊन देण्याच्या सेवेला प्राधान्य देऊन ती सेवा स्वीकारली. ते त्यांच्याकडील दोन्ही सेवांचे नियोजन करून सेवा करू लागले.

ई. शिवप्रसाद यांना एखाद्या नवीन सेवेचे दायित्व दिल्यावर त्या समवेत आलेल्या अडचणीही ते उत्साहाने स्वीकारतात. ‘सेवा करतांना येणारी प्रत्येक अडचण आपल्याला साधनेसाठी पूरक आहे’, असा भाव ठेवून ते सेवेतील अडचणी सोडवतात.’

– श्री. सुदीश पुथलत (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ६५ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.२.२०२५)