‘ईश्वरी राज्याच्या स्थापने’तील सर्व अडथळे दूर व्हावेत आणि येणार्या आपत्काळात सर्व साधकांचे रक्षण व्हावे, यांसाठी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात २५.७.२०२२ या दिवशी हंसवाहिनी याग झाला. यज्ञाच्या वेळी मला सहा हात असलेल्या श्री हंसवाहिनीदेवीचे रूप दिसले. देवी एका उच्च (दैवी) लोकातील जंगलात उभी होती.

१. साधिकेला श्री हंसवाहिनीदेवीच्या विषयी सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान
अ. हंसवाहिनीदेवी सरस्वती लोकातील एका नदीच्या जवळ असलेल्या जंगलात उभी होती.
आ. देवीचा आपतत्त्वाशी संबंध असून कमळ हे त्याचे द्योतक होते. त्यामुळे ती कमळात उभी होती.
इ. देवीच्या ५ हातांत ५ वेगवेगळी, उदा. खंजिरी (डफली), टाळ, चिपळ्या, खुळखुळ्यासारखे दिसणारे एक वाद्य आणि तानपुरा ही वाद्ये अन् एका हातात जपमाळ होती. ईश्वराकडून ज्ञान मिळवण्यासाठी त्याची उपासना करतांना ही वाद्ये वापरली जातात.
ई. हंसवाहिनीदेवी सरस्वतीदेवीचेच एक रूप असल्याने तिचे वाहनही हंस होते. त्यामुळे चित्रात पाण्यामध्ये हंस दिसत होता. लोक हंसवाहिनीदेवीची उपासना ज्ञान मिळवण्यासाठी करतात.
२. साधिकेने ईश्वराला विचारलेले प्रश्न आणि ईश्वराकडून त्यांना मिळालेली उत्तरे
२ अ. श्री हंसवाहिनीदेवीचे चित्र काढतांना भूमीवर तबला असल्याचे जाणवणे; पण ते देवीचे वाद्य नसल्याचे ईश्वराने सांगणे
प्रश्न : श्री हंसवाहिनीदेवीचे चित्र काढण्यास आरंभ केल्यावर मला ‘भूमीवर तबला आहे’, असे जाणवले. भूमीवर खरंच तबला आहे कि ती केवळ माझी कल्पना आहे ?
उत्तर : भूमीवर तबला नाही. चित्रातील अन्य वाद्यांशी तबला हे वाद्य जुळत नाही; कारण ती वाद्ये कनिष्ठ प्रतीची आहेत आणि तबला हे उच्च प्रतीचे वाद्य आहे.
२ आ. श्री हंसवाहिनीदेवीचे रूप दिसतांना वातावरणात अगदी अल्प प्रकाश दिसणे आणि ती ब्राह्ममुहूर्ताची वेळ असल्याचे ईश्वराने सांगणे
प्रश्न : जेव्हा मला हंसवाहिनीदेवीचे रूप दिसले, तेव्हा मला वातावरणात अगदी अल्प प्रकाश दिसत होता. त्या वेळी मला ‘दिवस नसून रात्र आहे’, असे जाणवले. हंसवाहिनीदेवीचे दर्शन मला रात्रीच्या वेळी का झाले ?
उत्तर : ती रात्र नसून पहाट होती. पहाटे ३.३० वाजता ब्राह्ममुहूर्ताची वेळ असून त्या वेळी वातावरण सर्वाधिक सात्त्विक असते. त्या वेळेत ज्ञान सहजतेने ग्रहण करता येत असल्याने देवीची उपासना केली जाते.
२ इ. हंसवाहिनीदेवी तिचे कार्य करण्यासाठी प्रकट होतांना लाल किंवा /आणि हिरवी साडी परिधान करत असणे अन् कार्य झाल्यावर ती तिच्या मूळ सरस्वतीदेवीच्या रूपात जात असणे आणि त्यामुळे साधिकेला साडीचा रंग कधी पांढरा, तर कधी लाल अन् हिरवा रंग दिसत असणे
प्रश्न : चित्र रेखाटतांना देवीच्या साडीचा रंग पालटत होता. साडीचा रंग कधी पांढरा, तर कधी लाल आणि हिरवा एकत्र दिसत होता. देवीच्या साडीचा रंग का पालटत होता ?
उत्तर : सरस्वतीदेवीचे तत्त्व पांढर्या रंगाचे असून ते अधिक निर्गुण आहे. जेव्हा हंसवाहिनीदेवी तिचे कार्य करण्यासाठी प्रगट होते, तेव्हा ती लाल आणि हिरवा रंग असलेली साडी परिधान करते. त्यामुळे तिचे कार्य अधिक जलद गतीने पूर्ण होते. तिचे कार्य पूर्ण झाल्यावर ती निर्गुण रूपात जाते आणि त्या वेळी ती पांढर्या रंगाची साडी परिधान करते. (‘हंसवाहिनीदेवीचे रूप पालटतांना तिने परिधान केलेल्या साडीचाही रंग पालटत होता. साधकांना सूक्ष्मातील ही प्रकिया कळण्यासाठी मी प्रत्येक टप्प्याचे चित्र रेखाटले आहे.’ – साधिका )
३. श्री हंसवाहिनीदेवीचे चित्र रेखाटतांना साधिकेला आलेल्या अनुभूती
३ अ. ‘श्री हंसवाहिनीदेवी माझ्याकडे पहात असून तिचा श्वासोच्छ्वास चालू आहे’, असे मला जाणवत होते.
३ आ. सरस्वती लोकाचे चित्र रेखाटतांना ‘मी त्या लोकात जात आहे’, असे मला जाणवत होते.
३ इ. श्री हंसवाहिनीदेवीचे चित्र रेखाटतांना मनात नकारात्मक विचार येणे आणि आध्यात्मिक स्तरावरील उपाय केल्यावर श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचा चेहरा डोळ्यांसमोर येऊन त्रास उणावणे : श्री हंसवाहिनीदेवीचे चित्र रेखाटण्याची सेवा करतांना ‘मला ही सेवा करायला जमणार नाही’, असे नकारात्मक विचार येत होते. माझ्या मनातील नकारात्मक विचार न्यून होण्यासाठी मी पुढील आध्यात्मिक स्तरावरील उपाय केले.
१. एका कागदावर नामजपाचे मंडल काढून त्यावर माझ्या मनातील सर्व नकारात्मक विचार लिहिले आणि कागद ‘शिष्य’ या सनातन-निर्मित ग्रंथात ठेवला.
२. आतापर्यंत ज्या ज्या संतांकडून मला मार्गदर्शन मिळाले, ते सर्व मार्गदर्शन मी वाचले.
३. मी भगवंताप्रती कृतज्ञता व्यक्त करत होते, तसेच माझ्याभोवती असलेले त्रासदायक शक्तीचे आवरणही काढत होते.
आध्यात्मिक उपाय केल्यावर श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचा तोंडवळा (चेहरा) माझ्या डोळ्यांसमोर आला. मी त्यांना आत्मनिवेदन केले आणि त्यानंतर माझा त्रास उणावला.’
– विदेशातील एक साधिका (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के)
|