स्वावलंबी आणि सतत नामजप करणारे पू. राजाराम नरुटे (वय ९२ वर्षे) !

‘पू. राजाराम नरूटेआजोबा (वय ९२ वर्षे) देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात निवासाला आहेत. एकदा मला २ दिवस त्यांच्या खोलीत त्यांना सोबतीसाठी त्यांच्या समवेत थांबण्यास सांगितले होते. तेव्हा मला शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.

पू. राजाराम नरुटे
श्री. कृष्णकुमार जामदार

१. पू. नरुटेआजोबा वयस्कर असूनही पलंगावरून सहजपणे उठतात आणि ‘वॉकर’च्या (४ पाय असलेल्या काठीच्या) साहाय्याने चालतात.

२. ते त्यांच्याकडे सेवेसाठी आलेल्या साधकांची प्रेमाने विचारपूस करतात.

३. ते स्वतः नामजप करतात आणि सहसाधकांना नामजप करण्याविषयी सांगतात.

४. पू. आजोबांकडून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्यामुळे आणि त्यांची कृतीशीलता पाहून मला माझी गुडघेदुखी अन् मंदावलेल्या हालचाली यांचा विसर पडला.

५. पू. आजोबांनी मला ‘ते सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना भेटले’, तो प्रसंग सांगितला. तेव्हा त्यांच्या चेहर्‍यावर पुष्कळ आनंद होता. त्या दिवशी खोलीमध्ये मंद सुगंध दरवळत होता.

मला पू. आजोबांचा सत्संग मिळाला, त्याबद्दल मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि पू. नरुटेआजोबा यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’

– श्री. कृष्णकुमार जामदार (वय ७४ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१८.२.२०२५)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक