
मिझोराममध्ये ख्रिस्त्यांची लोकसंख्या अल्प होत असल्याने ‘बॅप्टिस्ट चर्च ऑफ मिझोराम’ने अधिक मुले जन्माला घालण्याचे आवाहन केले आहे. केवळ ख्रिस्ती पंथाच्या रक्षणासाठी हा सल्ला देण्यात आला. ‘ख्रिस्ती अल्प होऊ लागले, तर त्याचा समाज, धर्म आणि चर्च यांवर नकारात्मक परिणाम होईल’, अशी चिंता भेडसावू लागल्याने या आवाहनाच्या माध्यमातून विवाहित जोडपी ख्रिस्ती पंथाच्या अस्तित्वाच्या दृष्टीने विचार करतील, असा चर्चचा यामागील विचार ! ख्रिस्ती लोक त्यांच्या पंथाविषयी किती जागृत असतात पहा ! आजवर अशा प्रकारचे आवाहन करणारी विधाने अनेक हिंदु नेत्यांनी केली; पण त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. त्यांची खिल्ली उडवली गेली. आता या चर्चच्या आवाहनाविषयी मात्र एकही धर्मनिरपेक्षतावादी बोललेला नाही, ना कुणी त्या विरोधात न्यायालयात याचिका प्रविष्ट केली. जे काही करायचे, ते अन्य धर्मियांनी आणि हिंदूंनी मात्र मुकाटपणे सहन करायचे, हा दुजाभाव ! मिझोराममध्ये हिंदु धर्माकडे ‘वैरी’ या भावनेनेच पाहिले जाते. एखादा प्रमुख नेता हिंदूंशी संबंधित असल्याचे दिसताच त्याची अपकीर्ती केली जाते. त्यामुळे तेथील हिंदूंना साहाय्य करण्याचा किंवा त्यांच्यासाठी तसदी घेण्याचा विचार करण्याचेही कुणी सौजन्य दाखवत नाहीत. मिझोराममध्येही मंदिरांवर आक्रमणे झाल्याची अनेक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. हे सर्व आता थांबायला हवे, नव्हे हे हिंदूंनी थांबवायला हवे.
महाराष्ट्रात मुसलमानांची वाढती संख्या पहाता हिंदू अल्पसंख्य होण्याच्या मार्गावर आहेत; पण त्याविषयी ना कुणाचे आवाहन, ना कसले प्रयत्न ! हिंदूंना त्यांची लोकसंख्या, धर्म, समाज यांच्या अस्तित्वाविषयी काहीच वाटत नाही. यामुळे हिंदु धर्माची परिस्थिती सध्या बिकट आहे. धर्माप्रतीचा अभिमान नसल्याने धर्मांतरात हिंदू अक्षरशः फसला जात आहे. हिंदूंनीही आता त्यांचे अस्तित्व टिकवण्यासाठी वेळीच हात-पाय हालवले नाहीत, तर हिंदूंची लोकसंख्या हाताच्या बोटावर मोजावी लागेल, इतकी होईल !
भारतातील अनेक समस्या या लोकसंख्यावाढीमुळे आहेत. त्यामुळे ९० च्या दशकात ‘२ किंवा ३ मुले पुरे’, असे आवाहन करण्यात आले होते. ग्रामीण भागांत हे आवाहन तेवढे स्वीकारले गेले नसले, तरी सुशिक्षित हिंदूंनी या आवाहनाला १०० टक्के प्रतिसाद दिला. त्याचप्रमाणे सरकारी नोकरीसाठीही काही राज्यात २ मुलांचे बंधन घालण्यात आले होते. त्यामुळे हिंदूंची लोकसंख्यावाढ नियंत्रित आहे. भारतात मुसलमानांमध्ये वर्ष २०१९ मध्ये प्रति महिला प्रजनन दर २-४ मुले होता, असा अहवाल आहे. त्या तुलनेत वर्ष २०१९-२०२१ मध्ये भारतातील हिंदूंचा एकूण प्रजनन दर १.९४ होता. स्थिर लोकसंख्या राखण्यासाठी आवश्यक प्रजनन दर किमान २.१ असणे आवश्यक आहे. हिंदूंचा प्रजनन दर त्या पातळीच्याही खाली आहे. त्यातच लव्ह जिहाद आणि इतर धर्मांतराच्या प्रकारांमुळे तरुण हिंदु मुली अन्य धर्मांत गेल्यामुळे त्या धर्मांची लोकसंख्या वाढत आहे. बहुसंख्येच्या आधारे वर्ष २०४७ पर्यंत भारताला इस्लामी राष्ट्र बनवण्याचेही मुसलमान कट्टरपंथियांचे षड्यंत्र आहे. यासाठी अधिक मुले जन्माला घालणे आणि अन्य धर्मियांचे धर्मांतर या गोष्टींना प्राधान्य दिले जात आहे. लोकसंख्यावाढीची समस्या केवळ भारतालाच नव्हे, तर संपूर्ण जगाला भेडसावत आहे. बेरोजगारीची समस्या त्यामुळेच निर्माण झालेली आहे. या बेरोजगारीमुळे गुन्हेगारीतही वाढ झाली आहे. लोकसंख्यावाढीचे हे आव्हान सरकार कसे पेलणार आहे ?