धवल गीतांमुळे आगरी-कोळी संस्कृती जतनाचे महत्त्वाचे कार्य चालू !- चंद्रकला दासरी, सुप्रसिद्ध धवल गायिका

जागतिक महिला दिनानिमित्त येथे पारंपारिक धवल गीतस्पर्धेचे आयोजन 

चंद्रकला दासरी, सुप्रसिद्ध धवल गायिका

नवी मुंबई – लग्न सोहळ्याचा मुख्य गाभा असलेल्या ‘धवल गीतां’च्या (विवाहात गायले जाणारे नवरदेवांविषयीचे गीत) स्पर्धा आयोजित करून चंद्रकांत पाटील यांनी आगरी-कोळी आगरी-कोळी संस्कृती जतन करण्याचे महत्त्वाचे कार्य केले आहे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध धवल गायिका चंद्रकला दासरी यांनी तुर्भे गाव येथे केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त येथे पारंपारिक धवल गीतस्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्रमुख पाहुण्या आणि परीक्षक म्हणून त्या बोलत होत्या. या वेळी सुप्रसिद्ध धवल गीत गायिका अवनी पाटील, नवनाथ ठाकूर यांच्या सह अन्य मान्यवर उपस्थित होते.

नवी मुंबईच्या इतिहासात प्रथमच आगरी-कोळी समाजातील लग्न समारंभामध्ये धवल गीतांचे गायन करणार्‍या धवलारीणींचा सन्मान सोहळा पार पडला.