नैतिक मूल्य संवर्धन स्पर्धेतील विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण !

नवी मुंबई – संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानच्या वतीने नवी मुंबईमध्ये घेण्यात आलेल्या नैतिकमूल्य संवर्धन (शिक्षण) स्पर्धेतील विद्यार्थ्यांना नुकतेच वाशी येथे एका कार्यक्रमात पारितोषिक प्रदान करण्यात आले. या स्पर्धेमध्ये ३ सहस्र ५०० हून अधिक मुलांनी सहभाग घेतला होता.

५० टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त ९०० विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. ९० टक्क्यांहून जास्त गुण घेणारे ३८ विद्यार्थी सुवर्णपदकासाठी पात्र ठरले. या वेळी विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक, तसेच पालक यांनी मुलांचे भरभरून कौतुक केले. प्रतिष्ठानच्या वतीने वैदिक मंत्रांचा उच्चार करून, तसेच पुष्पवृष्टी करून मुलांना पदक (पारितोषिक) प्रदान करण्यात आले.